कृषी देश

एक विचार, एक प्रवास!!

  • Categories

  • Google Ad

दिल्ली मधील दहशतवादी बॉम्ब हल्ला.

Posted by Sandeep Shelke on 7th September 2011

मित्रांनो,

दिल्ली पोलिसांनी जाहीर केलेल्या संशियीतांची छायाचित्रे.

पुन्हा एकदा आपल्या शंड आणि निष्क्रिय राजकीय नेतृत्त्वामुळे भ्याड दहशतवाद्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आवारात बॉम्ब हल्ला घडवून आणला. ह्या भ्याड हल्ल्यामध्ये ११ मृत्युमुखी पडले तर ७६ हून अधिक जखमी आहेत. जखमींमध्ये १५ जणांपेक्षा जास्त लोकांची प्रकृती चिंताजनक आहे. हुजी (हरकत-उल-जिहाद-अल-इस्लामी) ह्या पाकिस्तान आणि बांगलादेशस्थित इस्लामिक दहशतवादी संघटनेने ह्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

आणि ह्याच सरकारचे म्होरके असलेले पंतप्रधान मनमोहन सिंघ आसामचा ६०० एकरहून अधिक भाग बांगलादेशाला द्यायला गेलेले आहेत. कारण काय तर बांगलादेशातील बेकायदेशीर घुसखोरांनी जमीन बळकावली म्हणून, अरे उद्या दिल्ली बळकावतील घुसखोरी करून मग काय दिल्ली पण देणार का?

ह्या भ्याड हल्ल्यासाठी १३ जुलै चा मुंबई हल्ला, त्या आधीचा दिल्ली मधील माशिदिबाहेरील गोळीबार आणि शीतला घाटावरील बॉम्ब हल्ला ह्या गोष्टींची न झालेली चिकित्सा आणि त्याकडील दुर्लक्ष कारणीभूत आहे. तसेच काँग्रेस सरकारची देशातील सर्वच मुसलमानांना दहशतवादी समर्थक समजून काही माथेफिरुंवर कारवाई न करण्याची वृत्ती देखील. हा मुसलमानांचा अपमान तर आहेच पण देशाच्या सुरेक्षेचा मोठा प्रश्न आहे.

माझी मुसलमान बंधू-भगिनींना कळकळीची विनंती आहे कि त्यांनी असल्या जातीय तेढ वाढविणाऱ्या काँग्रेस सरकारला चांगलाच धडा शिकवावा.

रागावलेल्या पीडितांच्या नातेवाईकांनी राहुल गांधीला “श्री राम मनोहर लोहिया रुग्णालयातून” हाकलून दिले.

जय भारत!

Tags: , , , , , , , ,
Posted in आतंकवाद, भारत, मराठी | No Comments »

 
%d bloggers like this: