कृषी देश

एक विचार, एक प्रवास!!

  • Categories

  • Google Ad

‘कौटिलीय अर्थशास्त्र’ म्हणजे अंतर्गत राज्यकारभार आणि परराष्ट्रसंबंध यांचे विस्तृत विवेचन

Posted by Sandeep Shelke on 3rd February 2013

स्रोत: प्रा. र. पं. कंगले ह्यांच्या भाषांतरित ‘कौटिलीयम् अर्थशास्त्रम्’ ग्रंथामधून.

राजनितीवर पंथ-निरपेक्षपणे विचार करणारे प्राचीन भारतातील एकमेव शास्त्रीय लेखन. ह्या शास्त्रामध्ये सर्वस्वी इहलोकीच्या गोष्टींचाच विचार केला आहे.

सध्याच्या काळात अर्थशास्त्र हा शब्द ‘इकॉनॉमिक्स’ या अर्थी उपयोगात आणला जातो. परंतु ह्या ग्रंथाचा विषय तो नाही. १५व्या अधिकरणातील अर्थ ह्या शब्दाची व्याख्या:

“अर्थ म्हणजे उपजीविका, म्हणजेच मनुष्याची वस्ती असलेली भूमी. त्या भूमीचा म्हणजे पृथ्वीचा लाभ आणि तिचे पालन यांचे उपाय सांगणारे शास्त्र ते अर्थशास्त्र”(१५.१.१-२)

‘अर्थ’ म्हणजे इहलोकीच्या जीवनाची समृद्धता हा त्या शब्दाचा मूळ अर्थ. आणि हि समृद्धता संपत्तीमुळे प्राप्त होते. म्हणून संपत्ती असा ह्या शब्दाचा अर्थ होतो. सर्व प्रकारच्या संपत्तीच्या उत्पादनाला मनुष्याचे श्रम कारणीभूत होतात आणि हे उत्पादन अंततः भूमीतून – शेतांतून, खाणींतून – वैगेरे प्राप्त होते. तेव्हा संपत्तीनिर्मितीच्या मनुष्य व भूमी ह्या दोन्ही घटकांचा एकत्र निर्देश असलेला ‘मनुष्यांची वस्ती असलेला भूप्रदेश’ असा ह्या शब्दाचा अर्थ सहज निष्पन्न होतो.

पृथ्वीचा लाभ व पालन हि जी अर्थशास्त्राची दोन उद्दिष्टे त्यापैकी लाभाचा विचार म्हणजे मुख्यत्त्वेकरून एका राष्ट्राच्या दुसऱ्या राष्ट्रावरील आक्रमणाचा विचार. त्या संदर्भात साहजिकच परराष्ट्रसंबंधाचे विवेचन करणे क्रमप्राप्त होते. पालन करायचे ते पृथ्वीचे आणि तिच्यावरील माणसांचे. पृथ्वीचे पालन म्हणजे राष्ट्राचे रक्षण. ते रक्षण मुख्यतः शत्रूपासून करावयाचे असते. हा विषयही परराष्ट्रसंबधात अंतर्भूत आहे. राज्यातील मनुष्यांचे पालन म्हणजे त्यांचे दैवी आणि मानुषी आपत्तीपासून रक्षण करणे एवढाच अर्थ नसून त्यांच्या योगक्षेमाची काळजी वाहने हा अर्थ सुद्धा अभिप्रेत आहे. लोकांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या योगक्षेमाची काळजी घेण्यासाठी कारभाराची मोठी यंत्रणा उभारणे आवश्यक असते. म्हणून अंतर्गत राज्यकारभाराचा विचार हे  शास्त्राचे दुसरे अंग. ह्या दोन्ही अंगांचे – अंतर्गत राज्यकारभार आणि परराष्ट्रसंबंध यांचे – अत्यंत विस्तृत विवेचन कौटिलीय अर्थशास्त्रात केले आहे.

जय भारत!

Related: Quotes by Chanakya

Tags: , , , , , , , , , ,
Posted in चाणक्य, भारत, राजकारण | 2 Comments »

स्वदेशीच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना एक विनम्र आवाहन

Posted by Sandeep Shelke on 21st October 2012

Read in English

मला स्वदेशी चळवळीतील सर्व कार्यकर्ते आणि समर्थकांना एक विनम्र आवाहन करायचे आहे. आता वेळ आली आहे कि हा लढा केवळ भावनिक न राहता खुल्या बाजारात (श्रेष्ठ दर्जा आणि वाजवी दर असलेला माल) स्पर्धात्मक आव्हानाच्या रूपाने उभा करावा. कारण केवळ भावनात्मक आवाहन स्वदेशाच्या भरभराटीस चालना देण्याऐवजी चळवळीच्या अस्तित्त्वावरच संकट निर्माण करू शकते. भावना ना तर आर्थिक घडामोडींची जागा घेऊ शकतात नाही मुलभूत गरजा भागवू शकत त्या केवळ आपले लक्ष विचलित करू शकतात. एवढेच नाही तर स्वदेशी चळवळीचा उद्देश हा परकीय मालाला विरोध नाही तर स्वदेशी मालाची विक्री आणि व्यवसाय वाढविणे हाच अपेक्षित आहे.

जर स्वदेशी माल श्रेष्ठ दर्जाचा आणि वाजवी किंमतीचा असेल  तर मला स्वतःला देखील स्वदेशी माल खरेदी कायला आवडेल. मुळातच उच्च दर्जाची आणि वाजवी किमतीची कुठलीही वस्तू विकत घेणे अथवा निवडणे हा ग्राहकाचा मुलभूत अधिकार आहे. आणि त्यातच भारतीय ग्राहक चोखंदळ आहे हे काही वेगळे सांगायला नको. म्हणून, जर चार पैसे वाचणार असतील ते वाचवावेत ह्या मताचा मी आहे. स्वदेशी माल जर गुणात्मक दृष्ट्या चांगला आणि तोडीस तोड स्पर्धा करणारा असेल तर तो परदेशी मालापेक्षा जास्त यशस्वी होईल कारण त्यावेळी अशा मालाला एक वैशिष्ठ्य असेल ते म्हणजे तो “स्वदेशी” आहे. आणि हे साध्य करायचे असेल तर चाणक्यांनी जवळपास २४०० वर्षांपूर्वी सांगितलेले मुक्त बाजाराचे आणि आर्थिक विचारांची शिदोरी यथायोग्य वापरणे क्रमप्राप्त आहे.

पतंजली आयुर्वेद ह्या संस्थेने स्वदेशी मालाचा नुसताच भावनिक मुद्दा ना करता वाजवी दराची गुणात्मक उत्पादनांची निर्मिती करून स्वदेशी मालाला प्रोत्साहन दिले. आणि ह्यामुळेच त्यांनी देशातील आणि विदेशातील मोठ्या संस्थांना एक आव्हान उभे केले आहे. परंतु ह्याच वेळी चाणक्यांनी वेळोवेळी प्रतिपादित केली गोष्ट म्हणजे “नफा वाईट नसतो” ह्याचा विसर पडता कामा नये. अन्यथा कुठलाच आर्थिक उपक्रम दीर्घ काळ टिकणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
केवळ निष्क्रिय विरोध आपल्याला उत्कर्षाकडे घेऊन न जाता स्वयं ऱ्हास आणि तिसरे-जग हा दर्जा अखंड ठेवायला मदतच होईल. आणि मला वाटते कि स्वदेशी चळवळीचा असा उद्देश्य नक्कीच नाही, बरोबर? आपल्याला भरभराट, पूरक संधी आणि योग्य स्पर्धा ह्यांची निकडीची आवश्यकता आहे जेणेकरून आपण हे सिद्ध करू शकू कि आमच्या पूर्वजांनी जे वैभव कमावले होते ते आम्ही परत मिळवू शकतो.

होय मला खात्री आहे कि आपण पुन्हा एकदा जगातील सर्वात कार्यक्षम आणि श्रीमंत देश हे बिरुद मिरवू शकतो फक्त आपल्याला जे ज्ञान वंशपरंपरेने प्राप्त आहे ते स्वीकारण्याची आणि वापरण्याची आवश्यकता आहे. आपल्याला चाणक्यांनी जे धोरणं वापरली तेच धोरणं आधुनिक युगाशी जुळवत स्वीकारायचे आहेत. चाणक्यांच्या ह्याच सुत्रांमुळे इतिहासातील बलाढ्य, बलशाली आणि संपन्न भारताची स्थापना शक्य झाली होती. त्याचाच परिणाम म्हणून १७व्या शतकापर्यंत जगातील एकूण उत्पन्नाच्या २५% वाटा हा भारताचा होता. आणि आज आपला वाटा केवळ ५% इतका उरला आहे. आपणाला गेल्या ४-५ शतकांमध्ये ज्या समाजवाद नावाच्या अशास्त्रीय आणि निसर्ग विरोधी रोगाची लागण झाली आहे त्यापासून मुक्त होणे आत्यावश्यक आहे.

जय भारत!

Tags: , , , , , , ,
Posted in भारत, मराठी, माझे विचार, राजकारण | No Comments »

Appeal to Activists of Swadeshi Movement – Bharat

Posted by Sandeep Shelke on 19th October 2012

मराठी मध्ये वाचा

I would appeal to all supporters and activists of “Buy Swadeshi Movement” to take this fight to market and raise challenge through competition (with better quality and cost-effective products) instead of making emotional appeal. Since, emotive appeals wont lead Swadesh to prosperity instead that will be counter-effective for this very important movement. Emotions cant substitute economic activity or prosperity neither it can replace the basic needs, it would at the most distract the movement.

I would love to buy and promote Swadeshi products if an only if it is value for my money and is better in quality than any other product or at least is competitive enough. Then I think such enterprise and their products will become more successful compared any non-deshi company and their products since there will be the USP to it i.e. its ‘Swadeshi’. And lets pledge that we would be loyal to the concepts of economy that our Chanakya left for us about 2400 years ago.

The path that Patanjali Ayurved chose to promote Swadeshi is very inspiring. The way it has captured the imagination of country and became one of the big competitors for all MNCs in consumer daily products segment (MNC isn’t just a foreign company there are ‘Swadeshi’ too). But we need to remember that profits are not bad and has to be earned to promote any activity sustainably.

This passive opposition would lead us nowhere bust just to self decimation and continued third-world status. And certainly that’s not the goal of Swadeshi movement, right? We need prosperity, better opportunities, more competition to prove that we can bring back the glory that our ancestors had left for us. Yes we can become most productive and prosperous country of the world if we genuinely follow basic principles of economy presented by Chanakya with modern theories in mind. Chanakya’s economic sutras rendered a largest known and most prosperous Bharat. We were richest in the world till 17th century with 25% contribution to world economy. (GDP graph Courtesy: Visualizing Economics). Today our contribution to world GDP is just 5%. We need to free ourselves from the shackles of socialism since it has done more bad to us than any good.

Join Freedom Team of Bharat!

Jay Bharat

Tags: , , , , , ,
Posted in भारत, माझे विचार, राजकारण | 3 Comments »

प्रोत्साहन – स्वामी विवेकानंद

Posted by Sandeep Shelke on 11th September 2012

मराठी मध्ये:

जोपर्यंत लाखो लोक भुकेले आणि अज्ञानी जगतील, तोपर्यंत मी त्या सर्व मनुष्यांना गद्दार समजतो ज्यांना इतरांच्या जीवावर शिक्षण प्राप्त झाले व ते इतरांकडे थोडेसे ध्यान हि देत नाहीत.

हिंदी में:

जब तक लाखो लोग भूके और अज्ञानता में रहेंगे, तब तक मैं उन सभी मनुष्यों को गद्दार ठहराऊंगा, जिन्हें उनकी कीमत पर शिक्षा प्राप्त हुई और जो उनके प्रति थोडा भी ध्यान नहीं देते ।

In English:

So long as the millions live in hunger and ignorance, I hold every man a traitor who, having been educated at their expense, pays not the least heed to them.

जय भारत!

Tags: , , ,
Posted in भारत, मराठी, हिंदी, हिंदू | No Comments »

Why I joined Freedom Team Bharat?

Posted by Sandeep Shelke on 12th March 2012

Namaste Mitro,

When I think about future of Bharat and Bharati, become very uncomfortable and feel deprived of fundamental rights, because of the current creed of Bharatiy Politician and Bureaucrats.

More than 250000 farmer suicides in 15 years, Bhopal Gas leak victims still suffer, students are taught to bribe from the beginning (pay donation otherwise no admission), fake encounters, inhumane murder of social workers,  idols of nation (source of pride and inspiration) are maligned in the name of communal harmony(e.g. Chh Shivaji), whole nation is hostage in hands of some political family dynasties, you are not free to raise concerns openly, you are not free to exercise the freedom of creativity(some misuse it so all are punished) and speech, you can’t criticize/question politicians/policemen/bureaucrats for their corruptness, ineffectiveness and irresponsibility, terrorists under trial feast on tax payers money poking fun at the law and citizens of this land, landless labors and women are not farmers, economically backward is not minority but a religious is, workers and labors are sandwiched between owners and leaders, no relief to Mumbai mill workers even after 28 year-long agitation and suffering.

Why situation is so worse? Why I’m forced to learn only few subjects when I desire to learn more? Why there are not enough colleges to attend instead of allocating quota?

The main question is “Am I not free to decide my fate and destiny?”

The time has come where one must remember even in the dreams that “I’m born free and will be free till my last breath. It is my endeavor to deliver freedom to as many citizens as possible in my lifetime. I’m a human not just by birth but by learnings as well and it teaches me of Freedom. Since the times of  Ramayana, where a laundryman had liberty to criticize a royal lady, we have legacy of freedom of expression. And we owe this freedom to everyone in this living world.”

To join: visit Who can join

To know more: Freedom Team

जय भारत!

For more details please visit: Sandeep Shelke Member Page

Tags: , , , , , ,
Posted in भारत, माझे विचार, राजकारण | No Comments »

संत श्री एकलव्यदास जी महाराज का नृसिंह घाट पर आमरण-अनशन

Posted by Sandeep Shelke on 17th February 2012

उज्जैन, मध्य प्रदेश १५ फ़रवरी २०१२

उज्जैन के नृसिंह घाट पर १२ दिनो से आमरण-अनशन पर बैठे ८२ वर्षीय संत श्री एकलव्यदास जी महाराज शिप्रा नदी के सीमांकन, प्रदूषण मुक्ति, सफाई और गौवंश के संरक्षण और संवर्धन के लिए लगातार मांग उठा रहे है | लेकिन मध्यप्रदेश सरकार और स्थानीय प्रशासन दोनों ही इस दिशा में कोई ढोस कदम नहीं उठा रहे है | उज्जैन कुम्भ के लिए खर्च किए जा रहे करोड़ों रुपये ऐसी जगह लगाए जा रहे है जिसका कोई औचित्य नहीं है | शिप्रा नदी केंद्रीय प्रदूषण बोर्ड द्वारा जहरीली नदी घोषित कर दी गयी है जिसका पानी अब पीने लायक तो क्या नहाने लायक भी नहीं बचा है | इस दिशा में अब पूरे भारत वर्ष के १००० से ज्यादा संत एकलव्यदास जी के साथ उज्जैन में सामूहिक आमरण-अनशन शुरू करने जा रहे है |
जय भारत !

Tags: , , , , ,
Posted in भारत, राजकारण, हिंदी | No Comments »

 
%d bloggers like this: