कृषी देश

एक विचार, एक प्रवास!!

  • Categories

  • Google Ad

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४

Posted by Sandeep Shelke on 14th October 2014

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४:

२३३६ उमेदवारांपैकी ७९८ (३४%) उमेदवारांनी गुन्हेगारी खटले जाहीर केले आहेत. कॉंग्रेस, भाजप, मनसे, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या १३१८ उमेदवारांपैकी ६४० (४९%) उमेदवारांनी गुन्हेगारी खटले जाहीर केले आहेत. २००९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी कॉंग्रेस, भाजप, मनसे, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी उतरवले ६९८ उमेदवारांपैकी ३५२ (५०%) उमेदवारांनी गुन्हेगारी खटले घोषित केले होते.

 

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार:

उमेदवार

गुन्हे

गंभीर गुन्हे

आरोपपत्र

२०१४

२००९

२०१४

२००९

२०१४

२००९

२०१४

एकूण

१३१८

६९८

६४० (४९%)

३५२ (५०%)

४२५ (३२%)

२११ (३०%)

२६७ (४२%)

 

पक्षनिहाय गुन्हे आणि आरोपपत्र दाखल असलेले उमेदवार:

उमेदवार

गुन्हे

गंभीर गुन्हे

काँग्रेस

२८७

९६(३३%)

५६(२०%)

राष्ट्रवादी

२७७

११९(४३%)

८०(२९%)

भाजप

२५८

१३८(५३%)

८४(३३%)

शिवसेना

२७८

१६९(६१%)

११४(४१%)

मनसे

२१८

११८(५४%)

९१(४२%)

 

काही ठळक आकडे:

  • १२ उदेवारांवर खूनाचा तर ४४ उमेदवारांवर खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे

  • ४२ उमेदवारांनी महिलांवर अत्याचार केल्याचा गुन्हा असल्याचे जाहीर केले आहे.

  • २७ उमेदवारांनी बळजबरीने विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचे गुन्हे जाहीर केले आहेत.

  • ३२ उमेदवारांनी अपहरण केल्याचा गुन्हा असल्याचे जाहीर केले आहे.

  • दरोडा आणि चोरी केल्याचा गुन्हा दाखल असल्याचे ५२ उमेदवारांनी जाहीर केले आहे.

  • जातीय तणाव निर्माण केल्याचा गुन्हा दाखल असल्याचे १३ उमेदवारांनी जाहीर केले आहे.

  • १५६ मतदारसंघ संवेदनशील आहेत (३ किंवा अधिक उमेदवारांनी फौजदारी गुन्हा असल्याचे जाहीर केले असे)

Tags: , , , ,
Posted in मराठी, राजकारण | No Comments »

काही निवडक रचना ई-पुस्तिका म्हणून प्रकाशित

Posted by Sandeep Shelke on 9th February 2014

माझ्या आजपर्यंतच्या काही निवडक रचना ज्यांना मी कविता समजतो त्या संकलित करून ई-पुस्तिका म्हणून प्रकाशित केले आहे.

काही रचना

[Right click and select save link as]

मला कधी-कधी शब्द सुचतात आणि त्यांना मी कविता म्हणण्याचे धाडस करतोय. परंतु मी स्वतःला कवी म्हणवत नाही अशी प्रांजळ कबुली देतो. जे काही सुचते ते सभोवतालची परिस्थिती त्यातून निर्माण होणाऱ्या भावना ह्यांना शब्दरूप देण्याचा एक प्रयत्न, एवढंच.

काही रचना माझ्या नसून त्या इथे नमूद केल्या आहेत आणि तसा नामोल्लेख सुद्धा आहे.

हयातील सगळ्या रचना ह्या कृषीदेश वरती वेगवेगळ्या वेळी प्रकाशित केल्या आहेत. तसेच प्रत्येक रचेनेचे शीर्षक त्याच्या मूळ पानाशी दुव्यारुपी जोडलेले आहे.

रचनांची सूची 

गुलामी

जिथे मन भयमुक्त आहे आणि माथा उंचावलेला आहे

छोड़ दो उन गलियारों को

विश्वाची चिंता मज सतावते

हा देश कोणाचा आणि इथली मानसं आहेत तरी कोण

आली आली आळसावलेली दुपार

काही चूक आढळ्यास कृषीदेश वरती लिहावे अथवा Twitter मार्फत सुचवावे.

आभारी आहे.

– संदीप शेळके

तुमची प्रत इथून डोउनलोड  करा.

Tags: , , , ,
Posted in कविता, भारत | 5 Comments »

विश्वाची चिंता मज सतावते

Posted by Sandeep Shelke on 5th January 2014

कोण जाने का घरोघरी दुखः नांदते
न जाणे का विश्वाची चिंता मज सतावते

क्षणभंगुर आयुष्याची चटक एवढी लागते
सत्याचे रूपक मृत्यू शत्रू सम भासते

का केली बापुड्या घाई जगण्याची
निदान तारुण्य तरी उरकायचे सावकाश

प्रेम आणि सुखाच्या आमिषाने मनाचे झाले पायपुसणे
कसले प्रेम नि कसले सुख
आता घर आहे कधी धुराचे, कधी सुराचे तर कधी मयाचे

जिंकण्याची ओढ नव्हती मला कधीच
पण मला कळायच्या आधीच स्पर्धेने मला ओढले

— संदीप

Tags: ,
Posted in कविता, मराठी, माझे विचार | No Comments »

नेहमीची येतो दुष्काळ (Draught is routine)

Posted by Sandeep Shelke on 28th February 2013

“नेहमीची येतो पावसाळा” तसे आता “नेहमीची येतो दुष्काळ” असे म्हणायची वेळ आली आहे.

दर ३-४ वर्षांनी एक लहानसा दुष्काळ आणि दर १०-१२ वर्षांनी एक भयावह दुष्काळ, हे असे दुष्टचक्र प्रस्थापित होत आहे. बरं, अशा वेळी सरकार, विरोधक अथवा अन्य कोणाला दोष देऊन उपयोग होत नाही. कारण पाण्याची कमतरता भरून काढणे खिशातून नोटा काढण्याएवढे सोपे नाही. अर्थातच सरकारी दूरदृष्टीचा आणि आत्मीयतेचा अभाव हि गंभीर बाब आहे. परंतु ह्यामध्ये जनतेची, म्हणजेच आपली, काहीच चूक नाही का?

सोपे उदाहरण घ्या,

पूर्वी प्रत्येक शेताला मोठाल्या ताली घातलेल्या असायच्या. आता कुठे आहेत. १ फुटाचा बांध सुद्धा नको वाटतो. अजून बघायचे झाले तर बांधावरील झाडे. संपूर्णपणे गायब झाले आहेत. का? का तर त्यामुळे शेतात ओसावा पडतो. किती क्षेत्र? अगदी नगण्य असे. परंतु असा दुष्काळ पडल्यावर किती क्षेत्र रिकामे पडते? गावांची अवस्था मसनवटयापेक्षा भयानक आहे. रस्त्याच्या कडेला झाडे नाहीत, त्यामुळे पावसाने पडणारे पाणी वाहून तर जातेच पण सोबतच मातीही जाते. शेतांची अवस्था काही वेगळी नाही.

बरं आमच्यासारखा काही बोलला तर त्याला सरळ सुनावले जाते “तुम्हाला काय कळते त्यातले. आमचे अवघे आयुष्य गेले ह्याच्यात. पावसापुढे कोणाचे काही चालत नाही. सरकारने धरणाचे पाणी दिले पाहिजे.”

ह्या सगळ्या प्रश्नांना एकच उत्तर आहे:
प्रत्येक नागरिकाला स्वतःच्या जबाबदारीची जाणीव व्हायला पाहिजे.

सरकारने नक्कीच सकारात्मक भूमिका घ्यायला पाहिजे परंतु नागरिकांचा त्याला प्रतिसाद खूप महत्त्वाचा आहे.

जय भारत!

Tags: , , , ,
Posted in उपक्रम, मराठी, माझे विचार | 5 Comments »

Uddhav Thakare, please work for empowerment, freedom, opportunity.

Posted by Sandeep Shelke on 4th February 2013

image

This is really sickness. They start demanding freebies whenever there is any disaster. But no contingency plan. No plan in place to empower farmers, to make them self dependent.

Lets stop this non sense once. Uddhav Thakare, I don’t support such naive demands. Every time demanding waivers, subsidies sound like beggar than self-respecting human. Where are the real demands for freedom, freedom of expression, freedom of movement, equal opportunity etc..

Jay Bharat!

Tags: , , , , , ,
Posted in उद्यम व्यवसायिकता, भारत, मराठी, माझे विचार, राजकारण, शेती | No Comments »

पंतप्रधानांसाठी जाहीर पत्र (रक्षकच बनले भक्षक)

Posted by Sandeep Shelke on 24th January 2013

Read in English

प्रती,
कॉंग्रेस प्रणीत केंद्र सरकार,
भारत.

मा. पंतप्रधान महोदय,

गेल्या काही वर्षांमधील घटना आणि त्यावर तुमच्या सरकारच्या आणि परिणामी तुमच्या प्रतिक्रिया पाहिल्यावर असे दिसते कि तुम्हाला तुमच्या कामाचा विसर पडला आहे. त्या मुलभूत कामांची तुम्हाला आठवण करून देण्यासाठी, हा खटाटोप.

तुम्हाला ठरवून दिलेली मुख्य कामे:
१. नागरिकांचे व्यक्ती, संचार आणि व्यवसाय स्वातंत्र्य अबाधित राखणे
२. सर्वांना समान न्याय मिळवून देणे
३. अंतर्गत आणि बाह्य शत्रुंपासून जीवन आणि मालमत्तेची सुरक्षा करणे
४. समान संधी (त्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास) मिळवून देणे
ह्यासोबतच, प्रत्येक पै-न-पै चा हिशेब देणे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे.

वर ठरवून दिलेली कामे इमाने-इतबारे करण्याची शपथ घेतलेली असताना, खेदाची गोष्ट म्हणजे, तुम्ही ह्यातील एकही गोष्ट देऊ/पाळू शकला नाहीत. ह्याची नमुनादाखल खाली काही उदाहरणे दिली आहेत. क्रमशः

१. मागे एका व्यंग चित्रकाराने चित्र काढले म्हणून तुमच्याच कुठल्यातरी नियमानुसार त्याला अटक केली, अटक करणाऱ्यांवर काहीच कारवाई नाही.
२. महाराष्ट्र आणि आसाम मध्ये दुसऱ्या राज्यांमधून आलेल्या नागरिकांच्या जीवन आणि मालमत्तेचे नुकसान झाले, कोणावर काहीच कारवाई नाही.
३. समान न्याय दूरच राहिला परंतु देशाची संपत्ती लुटून भ्रष्टाचार करणाऱ्या तुमच्याच सहकाऱ्यांना साधे निलंबित सुद्धा केले नाही.
४. राजधानी सहित संपूर्ण देशभरात महिलांवरील अत्याचार, लुटमार आदींची परिसीमा झालेली असताना तुमच्याकडून काय पाऊल उचलले गेले? काहीच नाही याउलट, नको त्या विषयांवरून तुमच्या सहकाऱ्यांनी प्रसार माध्यमांमधून गदारोळ उठवून देशात अशांतंता निर्माण करण्याचे प्रयत्न केले.
५. सीमारेषा ओलांडून येउन काही दहशतवाद्यांनी देशाला वेठीस धरले, तुम्ही काय केले? तर त्या देशासोबत क्रिकेटच्या माध्यमातून चर्चा वाढवली.
६. एवढेच नाही तर त्या देशाने आपल्या सैनिकांना शांतंता रेषेजवळ अमानवीय रीतीने छळ करून मारले आणि एका सैनिकाचे शीर पळविले. तुमच्या सहकाऱ्यांनी देशप्रेमाच्या नावाखाली अतिरेक करू नका असे आम्हालाच सुनावले. एवढ्यावर न थांबता देशाला विरोधी पक्षापासून जास्त धोका आहे असे जाहीर प्रकटन करायला सुरुवात केली.
७. अशा परिस्थितीमध्ये गृहमंत्र्यांनी देशाची चिंता करायची सोडून बेछूट आणि बिन-बुडाचे युक्तिवाद सुरु केले कि ‘हिंदू दहशतवाद’ फोफावला आहे. खरच का? तसे असते तर ८०% हिंदू जनतेने जगभर हाहाकार माजवला असता. जगातील सर्वात सृजनशील आणि सहिष्णू समाजालाच दुषणे लावायला सुरुवात केली.
८. आम्हाला ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची भ्रांत असताना काही शहरांमधून पाण्याचा भल्या मोठ्या प्रमाणावर अपव्यय होताना दिसतो. तुम्ही काय पाऊले उचलली?
९. सर्वसाधारण गरीब जनतेला दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. तुम्ही काय केले? प्रत्येक वेळी एक नवीन योजना काढून भ्रष्टाचाराचे कुरण तयार केले. आणि नंतर रीतसरपणे विसरून जाता किंवा दुर्लक्ष करता.
१०. तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला, हिशोब मागितला तर तुम्ही आम्हाला अटक करता नाही तर आयकर विभागाकडून तपासाचा ससेमिरा नाहक मागे लावता. असे डूख धरून सूड बुद्धीने काम करायला आणि भाऊ-बंधकी निभवायला तुमची निवड केलीय का?
११. एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात सरकारच्या विरोधी बाजू घेतली; म्हणून, तुमच्याच कोण्या एका सहकाऱ्याने पोलिसांकडून त्या वकिलाच्या भावाला शनिवारी मध्यरात्री अटक केली आणि तुरुंगात बेदम मारहाण केली.

एवढे सगळे झाल्यावर, इतक्या सगळ्या चुका केल्यावर तुम्हाला हे काम करण्याची अजूनही संधी का द्यावी? संविधान आणि नागरिकाच्या सार्वभौमत्त्वाचा अनादर केला म्हणून तुमच्यावर अविश्वास ठराव का ठेवू नये?

आणि हो हे पत्र वाचल्यावर हा कोण, मला माझे काम सांगणारा? असा विचार चुकुनही करू नका कारण, मी, तुमचा मालक, ह्या देशाचा सार्वभौम नागरिक आहे.

जय भारत!
– एक जागसुक नागरिक.

Tags: , , , ,
Posted in भारत, मराठी, माझे विचार, राजकारण | No Comments »

 
%d bloggers like this: