कृषी देश

एक विचार, एक प्रवास!!

  • Categories

  • Google Ad

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४

Posted by Sandeep Shelke on 14th October 2014

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४:

२३३६ उमेदवारांपैकी ७९८ (३४%) उमेदवारांनी गुन्हेगारी खटले जाहीर केले आहेत. कॉंग्रेस, भाजप, मनसे, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या १३१८ उमेदवारांपैकी ६४० (४९%) उमेदवारांनी गुन्हेगारी खटले जाहीर केले आहेत. २००९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी कॉंग्रेस, भाजप, मनसे, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी उतरवले ६९८ उमेदवारांपैकी ३५२ (५०%) उमेदवारांनी गुन्हेगारी खटले घोषित केले होते.

 

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार:

उमेदवार

गुन्हे

गंभीर गुन्हे

आरोपपत्र

२०१४

२००९

२०१४

२००९

२०१४

२००९

२०१४

एकूण

१३१८

६९८

६४० (४९%)

३५२ (५०%)

४२५ (३२%)

२११ (३०%)

२६७ (४२%)

 

पक्षनिहाय गुन्हे आणि आरोपपत्र दाखल असलेले उमेदवार:

उमेदवार

गुन्हे

गंभीर गुन्हे

काँग्रेस

२८७

९६(३३%)

५६(२०%)

राष्ट्रवादी

२७७

११९(४३%)

८०(२९%)

भाजप

२५८

१३८(५३%)

८४(३३%)

शिवसेना

२७८

१६९(६१%)

११४(४१%)

मनसे

२१८

११८(५४%)

९१(४२%)

 

काही ठळक आकडे:

  • १२ उदेवारांवर खूनाचा तर ४४ उमेदवारांवर खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे

  • ४२ उमेदवारांनी महिलांवर अत्याचार केल्याचा गुन्हा असल्याचे जाहीर केले आहे.

  • २७ उमेदवारांनी बळजबरीने विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचे गुन्हे जाहीर केले आहेत.

  • ३२ उमेदवारांनी अपहरण केल्याचा गुन्हा असल्याचे जाहीर केले आहे.

  • दरोडा आणि चोरी केल्याचा गुन्हा दाखल असल्याचे ५२ उमेदवारांनी जाहीर केले आहे.

  • जातीय तणाव निर्माण केल्याचा गुन्हा दाखल असल्याचे १३ उमेदवारांनी जाहीर केले आहे.

  • १५६ मतदारसंघ संवेदनशील आहेत (३ किंवा अधिक उमेदवारांनी फौजदारी गुन्हा असल्याचे जाहीर केले असे)

Tags: , , , ,
Posted in मराठी, राजकारण | No Comments »

महाराष्ट्र ग्रामपंचायत : स्वरूप

Posted by Sandeep Shelke on 7th October 2012

ग्रामपंचायत हा पंचायती राज चळवळीतील सर्वात महत्वाचा आणि मुलभूत घटक आहे. पंचायत समिती अथवा जिल्हा परिषद ह्यांच्या यशस्वी कारभारासाठी सक्षम आणि सुदृढ ग्रामपंचायत हि पहिली पायरी आहे किंबहुना त्यांच्या कार्याचा मुख्य उद्देशच आहे.

ग्रामपंचायतीचे स्वरूप:

ग्रामपंचायत म्हणून मान्यतेसाठी पठारी भागात किमान ५०० लोकसंख्या हवी तर डोंगरी भागात ३००.
ग्रामपंचायतीची सदस्यसंख्या लोकसंखेनुसार ७-१७ पैकी कितीही असू शकते.

लोकसंख्या                  सदस्यसंख्या
——————–          ————–

५००-१५००                   ०७

१५०१-३०००                ०९
३००१-४५००                ११
४५०१-६०००                १३
६००१-७५००                १५
७५०१ हून अधिक           १७

ग्रामपंचायत सदस्यांची निवड हि सार्वत्रिक गुप्त मतदान पद्धतीने होते.
ग्रामपंचायतीचा कालावधी हा ५ वर्षांचा असून अविश्वास ठरवणे ग्रामपंचायत बरखास्त करता येते.
ग्रामपंचायत निवडणूक जाहीर करण्यापूर्वी मतदार यादी आणि प्रभाग रचना निश्चिती प्रसिद्ध केली जाते.
एका प्रभागातून २/३ सदस्य निवडून येतात.
निवडणुकी नंतर जिल्हाधिकारी निवडलेल्या सदस्यांची नवे जाहीर करतात.

ग्रामपंचायत सदस्याच्या निवडणुकीसाठी अर्जदाराची अर्हता:

१. गावाचा रहिवासी असावा.
२. गावाच्या मतदार यादीत नाव असावे.
३. अर्जदाराचे वय २१ पूर्ण असावे.
४. आर्थिक दिवाळखोर नसावा.
५. वेडपट नसावा.
६. अस्पृश्यता कायद्याखाली दोषी नसावा.
७. सरकारी कर्मचारी नसावा.
८. ग्रामपंचायतीचा थकबाकीदार नसावा.
९. रु. ५०० अनामत रक्कम भरावी लागेल.
१०. अर्जदारासाठी कसलीही शैक्षणिक पात्रता लागू नाही.

आणि अति महत्त्वाचा नियम म्हणजे “भारताचा(च) नागरिक असावा”

मतपत्रिकांचा रंग:

पांढरा            – सर्वसाधारण
फिकट पिवळा – मागासवर्गीय
फिकट हिरवा  – अनुसूचित जमाती
फिकट गुलाबी – अनुसूचित जाती-जमाती

जय भारत!

संबधित लेख: महाराष्ट्र ग्रामपंचायत: कार्ये आणि तलाठी कार्यालयातील नोंदवह्या

Tags: , , ,
Posted in ग्रामपंचायत, भारत, मराठी, राजकारण | No Comments »

कृषी विज्ञान केंद्रांची यादी

Posted by Sandeep Shelke on 1st September 2012

महाराष्ट्रातील कृषी विज्ञान केंद्रांची यादी आणि संकेतस्थळे:

१. कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर, अहमदनगर
२. कृषी विज्ञान केंद्र, अकोला
३. कृषी विज्ञान केंद्र, पाटखेड, अमरावती
४. कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा
५. कृषी विज्ञान केंद्र, चंद्रपूर
६. कृषी विज्ञान केंद्र, गोंदिया
७. कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली
८. कृषी विज्ञान केंद्र, कोल्हापूर
९. कृषी विज्ञान केंद्र, नागपूर
१०. कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार
११. कृषी विज्ञान केंद्र, नाशिक
१२. कृषी विज्ञान केंद्र, बारामती
१३. कृषी विज्ञान केंद्र, सातारा
१४. कृषी विज्ञान केंद्र, सिंधुदुर्ग
१५. कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर
१६. कृषी विज्ञान केंद्र, ठाणे
१७. कृषी विज्ञान केंद्र, वाशीम
१८. कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ
१९. कृषीके डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
२०. कृषी विज्ञान केंद्र धुळे

सर्वांच्या माहितीसाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागातील कृषी केंद्रांची यादी, त्यांचे संकेस्थळे एकत्रित केले आहेत.
कृपया जर यादी अपूर्ण अथवा चुकीची असेल तर मला कळवा.
आभारी आहे.

जय भारत!

संबंधित लेख – महाराष्ट्र राज्य कृषी विषयक संकेतस्थळांची यादी

Tags: , , , , ,
Posted in मराठी, शेती | 8 Comments »

Attending ‘Bharatiy Chhatra Sansad’, Pune 2012

Posted by Sandeep Shelke on 6th January 2012

This is a short post to inform all that I’ll be attending “Bharatiy Chhatra Sansand”.

Friends, we will be attending officially “Bharatiy Chhatra Sansad” that is happening between 10-12 January 2012 in Pune, Maharashtra on behalf of team CIPL. I request all those who are attending to please let me know so that we can catch up while the event.

Also let me know if any further information or help is required in Pune about accommodation, food, climate, transport, etc… I would be more than happy to do all that I can.

जय भारत!

Tags: , , , , ,
Posted in भारत | 1 Comment »

कड्याची दुर्लक्षित देशमुख गढी, वाट पाहते आहे जीर्णोद्धाराची

Posted by Sandeep Shelke on 19th September 2011

कडा: बीड जिल्ह्यातील नगर-बीड रस्त्यावरील कडा ह्या गावी एक १७ व्या शतकातील गढी आहे. हि गढी देशमुखांची आहे असे समजले, फारच जुजबी माहिती मिळाली. मला हे माझे कर्तव्य वाटले कि निदान कृषिदेश वर मी हि माहिती लोकांना द्यावी.

मी पश्चिम महाराष्ट्रात ठीक-ठिकाणी गेलो त्यावेळी आढळले कि निदान त्या भागातील लोकांनी अशा वास्तू जतन केल्या आहेत आणि शासनानेही कमी-अधिक फरकाने का होईना ध्यान दिले आहे. पण मराठवाड्यात ठिकठिकाणी हीच बोंब. अनेक ऐतिहासिक ठिकाणे उपेक्षित आहेत आणि वाट पाहतायेत जीर्णोद्धाराची.

आमचा आष्टी तालुका हा वारसा गमावेल असेच वाटतेय. लवकरच प्रशासन आणि कडा ग्रामस्थांनी लक्ष दिले नाही तर हि वास्तू काळजमा होऊन जाईल.

मी प्रत्येक्षादर्शी टिपलेले काही छायाचित्रे खाली आहेत.

विशेष म्हणजे १९९२ सालीच इतिहास संशोधन आणि पुरातत्त्व खात्याने येथील कागदपत्रे जमा करून घेतले आणि त्यानंतर अपेक्षेप्रमाणे काहीच पाऊल उचलले नाही.

जय भारत!

Tags: , , , , ,
Posted in इतिहास, भारत | 7 Comments »

श्रावणमासी हर्षमानसी

Posted by Sandeep Shelke on 12th August 2011

श्रावण मास

श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे

वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे

झालासा सूर्यास्त वाटतो, सांज -अहाहा तो उघडे
तरुशिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते

फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजूळ पावा गाई तयांचा श्रावण महिमा एकसुरे

सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला

सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती

देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत

-बालकवी (श्री. त्र्यंबक बापुजी ठोंबरे)

Tags: , , , , , , , ,
Posted in कविता, भारत, मराठी | 5 Comments »

 
%d bloggers like this: