आली आली आळसावलेली दुपार
Posted by Sandeep Shelke on 9th February 2014
गर्दीतून वाट काढत कार्यालयात पोहचावे घेउनी कष्ट अपार
झोप येते फार जेव्हा येते आळसावलेली दुपार
आली आली आळसावलेली दुपार
व्यवस्थापकाचे थोबाड पाहून द्यावा लागतो झोपेला नकार
तीही जाते कि नाटक करते न बोलता शब्द चकार
तशातच व्यवस्थापक बोलावतो बैठक दाखविण्या (थोबाडाचा) आकार
सगळेच मग झोपेत रेंगाळत मांडतात आपापले विचार
आली आली आळसावलेली दुपार
नसते मजा न अर्थ वाटे सगळेच बेकार
नोटांच्या जुडग्यापुढे होतो मी निराधार
नुसतेच रकाने भरून जीव झालाय बेजार
संपविण्या हा खोटा खेळ आडवा येतो पगार
आली आली आळसावलेली दुपार
– संदीप शेळके
Tags: kavita, Marathi Kavita
Posted in कविता, मराठी | No Comments »