कृषी देश

एक विचार, एक प्रवास!!

  • Categories

  • Google Ad

Archive for the 'माझे विचार' Category

मुखवटा

Posted by Mayuri Misal on 8th January 2018

आज कॉलेजमध्ये काही भलताच प्रकार घडला. निखिल आणि अविनाशमध्ये अचानक बाचाबाची सुरू झाली, ती दोघे एकमेकांना ‘तू खोटा आहेस, तुझा चेहरा खोटा आहे’ अश्याप्रकरे एकमेकांना बोलू लागले. आणि यानंतर निखिल न माझं मन आणि डोक अडगळीच्या खोलीत बंद वाव तशी परिस्थिती होईल अस वावग बोलून गेला… ‘तू तुझ्यातल्या “मी”ला जगापासून लपवतोस’… आणि या वाक्यानंतर माझ डोक चालेना, हा “मी” कोण? आणि हा निखिल कोणत्या “मी”बद्दल बोलतोय? मला काही उमजेना,आणि याचा विचार करत माझी दुपार कशी ओलांडली मला कळलंच नाही.

घरी आल्यावर मी हाच विचार करत बसले की माझ्यामध्ये सुद्धा हा “मी” असेल का? पण या “मी”ची नक्की व्याख्या काय? डोक्याला थोडा ताण देऊन मी एका विचारावर पोहचले आणि माझ्या “मी” ची मी स्वतचं एक व्याख्या तयार केली. प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे एक व्यक्तिमत्त्व असते.त्याचे विचार, त्याचा कल्पना असतात, त्याची जीवनशैली या सर्व मुल्यांच्या आधारावर त्या व्यक्तीमधील “मी” तयार होतो. त्या ‘मी’ची जडणघडण होते. पण कोणताही व्यक्ती आपल्यातल्या “मी” ला कधीच कोणाचा दृष्टीस पडू देत नाही,त्याचातल्या “मी” ची जाणीव करून देत नाही. पण मग तो व्यक्ती जीवनात नक्की कोणत व्यक्तिमत्त्व घेऊन जगतो?

“मुखवटा”… माझ्यातल्या “मी” नेच मला आवाज दिला, आणि तो निर्धास्तपणे पुढे बोलू लागला… काय बरोबर ना!… हे ऐकुन माझं डोकं सुन्न पडलं. पण वेळेला सावरून मी त्याला प्रतिप्रश्न करायचं ठरवलं, आणि मी पुढे बोलू लागले… तू म्हणतोस की तो माणूस मुखवटा चडवून वावरत असतो;पण का?त्याला त्या मुखवट्याची गरज का पडते? वेळ न घालवता त्याने प्रतिउत्तर दिले… “मुखवटा घालून वावरणार व्यक्ती अनेक प्रकारची असतात,काही मी असा वागलो तर लोक काय म्हणतील, ते आपल्याबद्दल काय विचार करतील अश्या अनेक गोष्टींचा विचारांचा काहूर त्याचा मनात थान मांडून बसतो, अग हेच काय काही मध्यमवर्गीय लोकांमध्ये त्यांच्या सरळ आणि साध्या राहणीमानावरून देखील त्यांना त्यांच्यातील “मी”ला उच्च वर्गातील लोकांसमोर प्रदर्शित करण्यास कचरतात; का? तर उच्च वर्गातील लोकांचा राहणीमान त्यांची जीवन जगण्याची रीत हे पाहूनच त्यांचा “मी” काळोखात दडून बसतो आणि मग तो व्यक्ती जगासमोर एक नवीन आणि स्वतःपेक्षा वेगळा असा “मी” निर्माण करून त्या बनावट “मी” ची कास धरून वावरतो पण तो “मी” हा “मी” नसून एक बनावट मुखवटा आहे; ह्याची कल्पना त्याला असतेच पण ती कल्पना तो जगाला दाखून देत नाही”.

हे ऐकुन तर मी आधीपेक्षा जरा जास्तच सुन्न झाले.पण माझं डोकं यावर प्रतिउत्तर देण्यास नक्कीच तयार होत त्यामुळे मी वेळ न दवडता पुढे बोलू लागले… “पण मग जगात सगळीच माणसे असा विचार करत असतील अस मला तरी नाही वाटत कारण काही माणसे ही त्यांचा प्रत्येक क्षण मनमोकळ्यापणाने जगतात,आपला वर्ग काय, आपल राहणीमान काय याचा विचार नाही करत. त्यांना त्यांचा क्षण महत्वाचा वाटतो.मग, ती माणसे आपला “मी”लपवतात का? आणि लपवलाच तर त्या मागे कारण काय असू शकते? यावर मात्र माझं मन एक क्रूर्तेच हसू हसायला लागलं, आणि माझं बोलणं व्यर्थं आहे अस मला भासवू लागलं, आणि ते पुढे बोलू लागलें… “अग अशी माणसे ओळखू येणं कठीणच! पण मी एक मन आहे आणि मला चांगलच कळत की हा व्यक्ती नक्की का? आणि कसा? विचार करत असतो ते”…

(मी आता मात्र खूपच उत्साही झाले आणि यावर माझं मन काय बोलणार यावर लक्ष केंद्रित करू लागले.) अग अशा व्यक्तींचा “मी” हा त्यांची एक दुखरी बाजू असते,जी बाजू ते लोकांपासून बाहेरील दूनियापासून लपवून ठेवतात; का? तर त्यांच्या दु:खर्या बाजूवर कोणी बोट ठेऊ नये, कोणी त्यांच्या दुःखर्या बाजूला धक्का देऊ नये”. यावर माझ्या डोक्याची शंका ही स्पष्ठतेत उतरत होती. आणि, याची जाणीव माझा मनाला होत होती त्यामुळे माझा पुढें काही प्रश्न असेल, असे त्याला वाटत नसणार कदाचित; पण तरीही त्याने विचारले, “काय पटतय ना? यावर मी माझ्या मनाशीच कस खोटं बोलणार! शेवटी तो माझा “मी” आहे म्हटल्यावर तर खोटं बोलणे अशक्यच! त्यामुळे माझा शेवटचा आणि मुद्याचा प्रश्न मी विचारावा अस माझ्या बुद्धीला वाटले आणि मी तेच केले.

आणि माझा मनाला एक शेवटचा प्रश्न विचारला. “यावर निष्कर्ष काय?” पण बहुतेक माझा मनाला या प्रश्नाची जाणीव होतीच त्यामुळे तो येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला सज्ज होता. “यावर निष्कर्ष काढता येणं जरा कठीणच!कारण प्रत्येक माणसाचा जगण्याचा दृष्टीकोण हा ठरलेला असतो,त्याच रीतीने तो जगत असतो. त्यामुळे आपण त्याचा मुखवटा सारण हे त्याचा दृष्टिकोनातून चुकीचं आणि त्याचा जगण्याचा रीतीला ठेच पोहचविण्याचे कारण बनू शकते, त्यामुळे आपण आपली रीत सोडायची नाही, आणि कोणत्याच प्रकारचा मुखवटा आपल्याला धारण करावा लागेल अशी स्थिती निर्माण होऊ द्यायची नाही, काय बरोबर बोलतोय ना!

“त्याचा या बोलण्यावर मी एक स्मितहास्य देऊन,आणि होकारार्थी मान डोलवून माझ्या लेखणी आणि कागदाकडे एकटक पाहत राहिले.

Posted in भारत, माझे विचार | No Comments »

असहिष्णुतेचे अवडंबर, थोतांड? कसला असुरी आनंद घेता नाचक्की करून?

Posted by Sandeep Shelke on 24th November 2015

सर्वात प्रथम मोदी किंवा भाजप म्हणजे भारत नाही.

मोदीवर, भाजपवर जी टीका करायची ती करा. पण आमच्या टाळूवरचे लोणी खाऊन दंगली करायला धष्टपुष्ट झालेल्यांनी भारतावर म्हणजेच सामान्य भारतीयांवर असहिष्णुतेचा आरोप करण्यापूर्वी एकदा स्वतःला विचरावे कि हे चूक कि बरोबर.

कोणी कोणी येतोय संघ म्हनजे आईसीस असं म्हणतो. बिनधास्त म्हणा. पण विचार करा जर खरच संघाने आईसीस सारखी मारामारी आणि मुंडकी कापायला, बलात्कार करायला सुरुवात केली तर आपल्यालाच बंदुका घेऊन लढावे लागेल. ज्याला तुम्ही शत्रू समजून असल्या कल्पना देत आहात त्यातल्याच काही लोकांनी चिडून अशी चूक केली तर किती महागात पडेल (कारण हेच सिकुलर म्हणतात कि इस्लामिक जिहादी दहशतवादी त्यांच्यावर लय दबाव नि खोटे आरोप नि अत्याचार झाला म्हणून तयार होतात). त्यामुळे आपण काय मागतो तेच निसर्ग/देव आपल्याला देतो.

सरकारवर टीका करण्यापेक्षा कारभारावर करा ना राव. मेंदूत सागरगोटे अडकले आहेत का?

असहिष्णुतेचे अवडंबर, थोतांड

असहिष्णुतेचे अवडंबर, थोतांड

मुळातच ते संविधान असहिष्णू आहे.
– त्याला समलिंगी लोकं नाही चालत
– एका राज्याला एक नियम तर दुसऱ्या राज्याला दुसरा नियम
– जातीवर आधारित व्यवस्था तयार करून ठेवली आहे
– गायीला विशेष दर्जा देऊन बैल, म्हस, रेडे, कुत्रे, आदी जनावरांवर अन्याय, सगळ्यात जास्त त्या बोकड व कोंबडीवर त्यांना कुणीच वाचवत नाही सगळेच खातात.
– अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाहीच त्याच्यामध्ये
– समान न्याय मिळत नाही (सबका न्याय समान न्याय व्यवस्था असल्याशिवाय नाही मिळणार मोदी साहेब 😉 )

स्वतः डॉ आंबेडकर म्हणाले होते कि असल्या संविधानाचा जाळ केला पाहिजे. (पटत नसेल तर राज्यसभेच्या जुन्या चर्चा वाचा १९५२-५३ सालची आंध्रप्रदेश विषयावरची चर्चा आहे)

हे सगळे त्या नेहरूंने तयार केले. त्यावर एक पण मायचा लाल आला नाही कि ज्याने मुलभूत प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला. मोदी पण काही वेगळे नाही.

परंतु यांच्या सत्तेच्या भांडणात आम्हा देशवासियांना यातना. कांग्रेस ने मुसलमान दलित अशा गोष्टी राजकारणात इतक्या रुजवल्या कि पर्यायी मतदार म्हणून भाजप हिंदुत्व करत बोंबलू लागला.

मनमोहन सिंग: देशावर पहिला हक्क अल्पसंख्य समाजाचा (आम्ही काय सावत्र आईचे आहोत का?)
मोदी: आम्ही राम मंदिर बांधणार (खुशाल, आमच्या पोटात तोवर आम्ही बिबे घालतो)

भोकात जा लेकांनो. देशाला परिणामी प्रतिनिधीरहित देशवासियांना नावे ठेवल्याने, जगभरात आमची नाचक्की करून काय मिळते? कसला असुरी आनंद घेता?

बोला चांगभलं असहिष्णुतेच्या नावाने चांगभलं.

Tags: ,
Posted in आंबेडकर, आतंकवाद, माझे विचार | No Comments »

शासन व्यवस्था का व कशी पाहिजे – मोदी

Posted by Sandeep Shelke on 18th January 2015

१६ जानेवारी २०१५ रोजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशातील शासन व्यवस्था का व कशी असावी यावरील विचार आंतरराष्ट्रीय वित्तीय परिषदेमध्ये मांडले. त्यांनी केवळ हे विचार बोलून दाखवले, परंतु ते कधी आणि कशा रीतीने पूर्ण करणार याविषयी वाच्यता नाही केली. असो, वरकरणी तरी त्यांनी मांडलेले खालील विचार देशासाठी चांगले आहेत असे मानता येईल. तसेच पंतप्रधान बोलतात त्यावेळी तेच शासनाचे धोरण आहे असे मानण्यास काही हरकत नाही.

सरकार किंवा शासन व्यवस्था का पाहिजे?

१. सार्वजनिक भल्यासाठी (बह्यांतर्गत सुरक्षा, न्याय व्यवस्था)

२. प्रदूषण, वातावरण बदल आदी गोष्टींवर नियंत्रणासाठी नियामक संस्था म्हणून

३. बाजारातील एकाधीकारासारख्या गोष्टींवर नियमन करण्यासाठी (माझं मत: बाजारावरील नियंत्रण हे अनैसर्गिक आहे. त्यामुळे त्यांना नक्की काय काय नियमित करायचे आहे याविषयी अजून स्पष्टता यायला हवी)

४. औषधासारख्या जीवनावश्यक वस्तूंची विश्वासार्हता दर्शविण्यासाठी (माझं मत: नक्की कोणत्या कोणत्या गोष्टी सरकारी दृष्टीने जीवनावश्यक आहेत आणि ते कसे ठरवतात हे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण कांद्यासारख्या पदार्थाला जीवनावश्यक यादीत टाकून नसती ढवळाढवळ वाढते…)

५. वंचितांना समान संधी मिळवून देण्यासाठी. वंचितांना सक्षम करण्यासाठी शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा मिळवून देण्यासाठी. (माझं मत: सरकारने गरीब आणि वंचितांसाठी निश्चितच पाऊल उचलले पाहिजे. परंतु तसे करताना स्वस्त धान्य दुकान, ग्रामीण रोजगार सारख्या योजनांच्या माध्यमातून बाजारातील ढवळाढवळ बंद केली पाहिजे. गरजूंना त्यांच्या बँक खात्यात उचित रक्कम द्यावी म्हणजे त्यांना हवे तिथून हव्या त्या गरजेच्या वस्तू विकत घेण्याचे स्वातंत्र्य मिळेल…)

सरकार किंवा शासन व्यवस्था कशी पाहिजे?

१. कार्यतत्पर आणि पै-पै साठी उत्तरदायी

२. व्यवसायामध्ये आणि खासगी जीवनात ढवळाढवळ करू नये

३. कार्यक्षम, प्रभावी, आणि प्रामाणिक

४. कायदे हेच सरकारचे गुणसूत्र असावे आणि ते कालानुरूप बदलत रहावे

सौजन्य> http://www.narendramodi.in

सौजन्य> http://www.narendramodi.in

आता हे सगळे साध्य करण्यासाठी ते काय नियोजन मांडतात ते पाहणे आवश्यक आहे.

माझ्या मते, खालील काही गोष्टी त्यांनी तत्काळ बदलायला हव्यात. 

१. सरकारी अधिकारी निवडीसाठी असलेली वयोमर्यादा काढून टाकावी. तसेच केवळ लोकसेवा आणि राज्यसेवा आयोगातून भारती करण्या ऐवजी खासगी संस्थांच्या धर्तीवर निवड करावी.

२. संशोधन संस्थामधील सरकारी मक्तेदारी संपुष्टात आणावी.

३. कोणालाही शाळा, महाविद्यालय उभारण्याची परवानगी असावी. तसेच अभ्यासक्रम ठरविण्यातील सरकारी मक्तेदारी संपुष्टात आणावी. तसेच ग्रामीण भागात वैद्याकीत महाविद्यालये उभारण्यासाठी जाचक अटी काढून टाकाव्यात.

४. हॉटेल, विमान, विमा, बँक आदी व्यवसायातून सरकारी भागीदारी विकून टाकावी. आणि तसेच सरकार परत कधीही व्यवसाय करणार नाही असा कायदा करावा.

५. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सगळे कायदे आणि न्यायव्यवस्था हे स्थानिक भाषेतून करावेत. हा बदल अतिशय महत्त्वाचा आहे कारण स्थानिक लोकांच्या भाषेतून असेल तरच तो समाज विकासाच्या आणि उन्नतीच्या वाटेवर मोठ्या प्रमाणात सहभागी होईल)

६. विविध विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांना जात, पंथ, व्यवसाय, वय, लिंग, स्थान आदि भेदावरून प्रवेश नाकाराण्याविरोधी कायदा करावा. आणि वित्तीय संस्थांना शैक्षणिक कर्ज प्राधान्याने द्यावे अशी विनंती करावी (आदेश नाही).

एक आपल्या सगळ्यांनाच मान्य करायला हवे कि मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी श्री बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर्थिक शिकवणीनुसार वाटचाल करण्याची वाच्यता वेळोवेळी केली आहे. अपेक्षा तर आहेच कि त्यात त्यांना यश मिळावे परंतु त्यासोबत आपण सगळेच आपापले काम प्रामाणिकपणे आणि कार्यक्षमतेने करूया. तरच आपल्याला आपले गतवैभव प्राप्त होईल.

जय महाराष्ट्र! जय भारत!

Tags: , , , ,
Posted in भारत, मराठी, माझे विचार, स्वातंत्र्य | No Comments »

मतदान अनिवार्य

Posted by Sandeep Shelke on 16th November 2014

गुजरात सरकारने नुकतेच स्थानिक निवडणुकांमध्ये मतदान करणे सक्तीचे केले आहे. होय आता मतदान अनिवार्य आहे. मतदान अनिवार्य केल्यामुळे जाती-पातीच्या, पंथाच्या, मतदान पद्धतीला लगामबसण्याची अपेक्षा आहे (कारण सध्या तेवढंच माझ्या हाती आहे). तसेच सर्व नागरिकांच्या मतांसाठी उमेदवारांना काम करावे लागेल असे चित्र निर्माण होईल. आणि नागरिकसुद्धा जागरूकपणे आपला मतदार धर्म निभावतील अशी अपेक्षा वाटते. तसेच जगातील ३३ देशांमध्ये मतदान सक्तीचे आहे त्यांच्या अनुभवातून शिकून कायदा तयार व्हावा आणि त्याची अंमलबजावणी पण व्हावी.

मतदान सक्तीचे करायचे असेल तर काही मुलभूत बदल करावे लागतील असे माझं मत आहे, त्याशिवाय हा कायदा केवळ अजून एक भ्रष्टाचाराचे कुरणं तयार करील.

१. मतदान करण्यासाठी विविध माध्यमं उपलब्ध करावीत. माझं मत

नुसतेच मतदान अनिवार्य करून भागणार नाही त्यासाठी विविध पर्याय उभे करावे लागतील. लोकांना त्यांच्या सोयीनुसार मतदान करता येईल अशी माध्यमं उपलब्ध करून द्यायला हवेत. जसे कि पत्राद्वारे, मोबाईल/इंटरनेटच्या माध्यमातून मतदान करण्याची व्यवस्था करावी.

२. मतदान केवळ एका दिवसापुरते मर्यादित असू नये.

मतदान केवळ एका दिवसासाठी असण्यामुळे मतदारांवर अनेक मर्यादा येतात. मतदानाच्या दिवशी मतदाराला अनेक अडचणी येऊ शकतात जसे मालाची विक्री करणे, आपत्कालीन प्रवासात असणे, कोणी आजारी असणे, नातेवाईकाचा अपघात, मृत्यू आदी. अशा नैसर्गिकपणे येणाऱ्या अडचणींमुळे जबाबदार नागरिक नाहकपणे अपराधी ठरेल.

३. राष्ट्रीय स्तरावर वर्षातील एक आठवडा/दिवस मतदान साप्ताह/दिन म्हणून घोषित करावा.

आज वर्षातील २-३ वेळा वेगवेगळ्या निवडणुका येतात, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना ह्याचा नाहक ताण सोसावा लागतो. जर वर्षातील ठराविक एक आठवडा/दिन जर निवडणुकांसाठी पूर्व नियोजित केला तर त्यामुळे नागरिकांना त्यांच्या कामाचे विशेष नियोजन करता येईल आणि व्यवसायांना मतदानासाठी सुट्टी देण्याची गरज भासणार नाही. अशा प्रकारे नागरिकांचा वेळ म्हणजेच राष्ट्रीय संपत्तीचा विनियोग होईल.

४. मतदार नोंदणीची प्रक्रिया सुलभ करणे.

५. महत्त्वाचे म्हणजे सर्व उमेदवारांना एक-मेकांसमोर उघड चर्चेची सक्ती करावी. आणि या सर्व चर्चा कॅमेऱ्यासमोर असाव्यात. म्हणजेच एखाद्या उमेदवाराकडून काही अनुचित प्रकार घडला तर त्याला लागलीच बाद करण्याची सोय होईल.

ज्यावेळी मतदान अनिवार्य करण्याची बातमी वाचली तेव्हा वरील विचार चटकन मनात आले.

जय भारत ! जय महाराष्ट्र !

Tags: , ,
Posted in माझे विचार, राजकारण | 1 Comment »

My commitment

Posted by Sandeep Shelke on 10th November 2014

In 2011 I resigned from full-time job at Cognizant and joined CIPL to study philosophy. Here are related declaration Politics, Inseparable part of Citizens of Democratic Nation and Why my decision to challenge them is DAMN right. But I did not write anything after that. But I resigned from Freedom Team too. So what happens to my commitment of working for prosperous Bharat?

So what am I doing now? Where am I? Time has come to take stock of my commitment and account the actions in past 3 years.

In Jan 2012 I realized I’m financially unsustainable and can’t continue my study. And I left CIPL in haste. (I do think I should have completed six months there). I was not able to concentrate on my studies as my family was struggling to keep with day-to-day living. And while studying Chanakya’s philosophy it became clear to me that first responsibility is towards family. My prime duty was to support family in the ongoing crisis. And decided to do that.

I joined iGate Patni in Feb 2012. Spent few months there and then joined Emerson Innovation Center-Pune in  May 2012. This way I started helping reduce the financial pressure on family. Then in May 2014 moved to Roxar in Norway. As of now things have started easing. By leaving my full-time job in duress in 2011 I realized “Any unplanned move in duress is definite way to slow down the work”. Now I’m taking due care and enough planning to begin my journey. I shall announce my next move in due time.

It is my duty to inform all my well-wishers and friends about my actions. It is important to account for my actions and responsibilities from time-to-time.

I’m presently working on a plan to start gurukul ashram, tree seeds sowing(वृक्ष बीज रोपण), economic model for micro and small enterprises. I’m committed to work with micro and small enterprises as I believe that these are the best ways to prosperity.

जय भारत!!

Tags: ,
Posted in माझे विचार | 1 Comment »

आमच्या जेवणातलं लोह कुठं गेलं

Posted by Sandeep Shelke on 6th November 2014

सर्वेक्षणामध्ये[1] आढळून आलं कि भारतामध्ये अंदाजे ५२% महिलांना लोहाच्या कमतरतेमुळे होणारा अशक्तपणाचा आजार आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर प्रत्येक दुसरी स्त्री ही अशक्तपणाची रुग्ण आहे. आणि हा अशक्तपणा लोहाच्या कमतरतेमुळे येत असल्याचे आढळून आले आहे. मला प्रश्न पडला कि असं आपल्या जेवणातलं लोह कुठं गेलं?

सौजन्य: http://misalpav.com

रक्तरंजक द्रव्य कमी पडले कि अशक्तपणा येतो. म्हणजेच रक्तातील प्राणवायूचे प्रमाण कमी होते परिणामी थकवा, निरसता येते.

लोहाच्या कमतरतेमुळे नेमकं काय होतं?
– स्त्रियांच्या शरीरातून मासिक पाळीच्या काळात मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होतो त्यामुळे कंबरदुखी, अशक्तपणा असे त्रास अधिक जाणवतात.
– गरोदर स्त्रीला हा आजार असेल तर बाळाचा जन्म ९ महिन्याच्या आधी होऊ शकतो, तसेच अशा बाळाचे अपूर्ण वाढ झालेली असते आणि त्यामुळे विविध आजार होऊ शकतात.
– रोग प्रतिकारक क्षमता कमी होते.
– निरुत्साह येतो.
– जिभेला फोड येतात, ज्याने खाण्या-पिण्याची अडचण होते.
– शरीराचे तापमान अनियंत्रित होते आणि तणाव जाणवतो.
– अगदी चालण्यामुळे सुद्धा थकवा येतो.

लोहाचं आपल्या शरीरातील काम
– रक्तामधून प्राणवायू (ऑक्सिजन) वाहून नेणे. लोह हे हेमोग्लोबिनचा (रक्तरंजक द्रव्य जे लाल रक्तपेशींना लाल रंग देते) महत्त्वाचा घटक आहे.
– स्नायूंमध्ये प्राणवायू साठवणे आणि वापरण्यास सहाय्य करणे.
– पचन क्रियेमध्ये लोहाचे महत्त्वाचे काम असते.
– शरीरातील जवळपास सगळ्याच अवयवांना लोहाची आवश्यकता असते.

भारत सरकारच्या सर्वेक्षणानुसार आहारातील लोहाचे प्रमाण गेल्या २० वर्षात खूप घसरले आहे. अशा प्रकारे सरसकट लोह खाणे कमी कसे झाले असेल? ह्यावर विचार करताना अनेक गोष्टी सामोरे आल्या. काही लोकांनी असाही अभ्यास मांडला कि, भारतीय स्त्रिया फारसा मांसाहार नाही करत. डाक्टर लोकांनी तर लोहाच्या गोळ्या देणं  हा यावरील उपाय शोधला. ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे जवळपास प्रत्येक गरोदर बाईला लोहाच्या गोळ्या ह्या घ्याव्याच लागतात. विचित्र नाही वाटत का? अचानक असा काय घडायला लागले कि इतक्या मोठ्या प्रमाणावर लोहाची कमतरता हि देशाची डोकेदुखी झाली?

मला एक महत्त्वाचे कारण वाटते ते म्हणजे आपली जेवण तयार करण्याची बदलेली पद्धत. पूर्वी बहुतांशी घरांमध्ये चपाती/भाकरी, भाजी करायला लोखंडाचे भांडे असायचे. आणि लोखंडाच्या भांड्यात स्वयंपाकाचे फायदे:
– भांड्यामध्ये समान प्रमाणात उष्णता पसरते.
– कमी तेलामध्ये खरपूस जेवण तयार होते.
– कृत्रिम रसायनमुक्त जेवण तयार होते (चोपट न होणाऱ्या (नॉन-स्टिक) भांड्यांची रसायनं(perfluorocarbon) जेवणात उतरतात)
– आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोखंडाच्या भांड्यात तयार केलेल्या जेवणात १०-२० पट अधिक लोह जेवणात येते. म्हणजे शाकाहारी खाणाऱ्याला लोहाची कमतरता राहणार नाही.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोच करायला मदत करा.

जय भारत!

[1] Anaemia Deficiency – भारत सरकार

Tags: , , , , ,
Posted in मराठी, माझे विचार | No Comments »

 
%d bloggers like this: