कृषी देश

एक विचार, एक प्रवास!!

  • Categories

  • Google Ad

Archive for the 'शेती' Category

Debating various aspects of agricultural scenario of past and today.

शेकडो टन कांदा विकणे आहे

Posted by Sandeep Shelke on 15th September 2012

माझ्या गावातील शेकडो टन कांदा विकत घेण्यासाठी हॉटेल, खानावळी, कांदा प्रक्रिया, कांदा वितरक अशा आदी सर्व व्यावसायिकांना कांदा खरेदीसाठी खुले निमंत्रण. शेतकऱ्यांना आपला माल शक्य तेवढ्या लवकर विकायचा आहे.

मी कांदा खरेदीदारांना विनम्र आव्हाहन करतो कि जर तुम्हाला कांदा विकत घ्यायचा असेल तर त्वरित संपर्क साधावा. ई-मेल करा (krishidesh AT gmail COM) अथवा मला फोन करा ९०११९८२८२८ (संदीप शेळके).

चला एक पाऊल उचलून शेतकऱ्यांना त्यांचा माल खरेदी करून मदत करू आणि त्यांना कर्जबाजारी होण्यापासून वाचवू.

 जय भारत!

Invitation in English: Onion for sale

Tags: , , , ,
Posted in भारत, मराठी, शेती | 1 Comment »

Government, Farmers and That FDI [My tweets]

Posted by Sandeep Shelke on 15th September 2012

 

Here are some facts about the retailers in the world and my doubts about FDI in retail.

Jay Bharat!

Related articles: FDI in Retail – A macro analysis And

,

Tags: , , , , , , ,
Posted in World Affairs, भारत, शेती | No Comments »

राष्ट्रीय कृषी विषयक संकेतस्थळांची यादी

Posted by Sandeep Shelke on 9th September 2012

१. कृषी हवामानाचा सल्ला
२. कृषी हवामान अंदाज
३. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान
४. भारत मौसम विज्ञान विभाग
५. नारीयाल विकास बोर्ड
६. राष्ट्रीय औषधी वनस्पती बोर्ड
७. राष्ट्रीय गळीत धान्य व वनस्पती बोर्ड
८. राष्ट्रीय बागवानी बोर्ड
९. भारतीय कपास निगम लिमिटेड
१०. केंद्रीय कापूस संशोधन संस्थान
११. केंद्रीय कपास प्राद्योगिकी अनुसंधान संस्थान
१२. कापूस विकास संचालनालय
१३. भात विकास संचालनालय
१४. गहू विकास संचालनालय
१५. ऊस विकास संचालनालय
१६. काजू व कोको विकास संचालनालय
१७. जूट विकास संचालनालय
१८. कॉफी बोर्ड
१९. राष्ट्रीय कांदा लसून संशोधन केंद्र
२०. सुपारी व मसाला पिके विकास संचालनालय
२१. राष्ट्रीय काजू संशोधन केंद्र
२२. भारतीय काजू निर्यात संवर्धन केंद्र
२३. तंबाखू बोर्ड
२४. तंबाखू विकास संचालनालय
२५. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र
२६. राष्ट्रीय लिंबू वर्गीय फळ संशोधन केंद्र
२७. राष्ट्रीय भुईमुग संशोधन केंद्र
२८. राष्ट्रीय सोयाबीन संशोधन केंद्र
२९. राष्ट्रीय ज्वारी संशोधन केंद्र
३०. बाजरा विकास संचालनालय
३१. तांदूळ माहिती व्यवस्थापन पोर्टल
३२. राष्ट्रीय औषधी व सुगंधी वनस्पती संशोधन केंद्र
३३. कृषी लागत और मूल्य आयोग
३४. कृषी और प्रसंस्कृत खाद्य उत्पाद निर्यात विकास प्राधिकरण
३५. कृषी एवं सहकारिता विभाग, कृषी मंत्रालय
३६. चौधरी चरण सिंघ राष्ट्रीय कृषी विपणन संस्थान
३७. खाद्य प्रसंस्करण उद्योग मंत्रालय
३८. भारतीय खाद्य निगम
३९. केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थान
४०. क्वायर बोर्ड ऑफ इंडिया
४१. भारतीय रबर बोर्ड
४२. फिक्की – शेती-व्यवसाय माहिती केंद्र
४३. राष्ट्रीय कृषी और ग्रामीण विकास बँक
४५. नैशनल सीड्स कार्पोरेशन
४६. भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ मर्यादित – नेफेड
४७. राष्ट्रीय वनस्पती जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्र
४८. राष्ट्रीय कृषी विकास योजना
४९. राष्ट्रीय कृषी विस्तार प्रबंध संस्थान
५०. भारतीय कृषी अनुसंधान परिषद
५१. इक्रीसॅट
५२. उपभोक्ता मामले विभाग
५३. पशुपालन देयारी और मत्स्य पालन विभाग
५४. कृषी प्रसंस्कृत खाद्य उत्पाद निर्यात विकास प्राधिकरण वाणिज्य एवं उद्योग मंत्रालय, भारत सरकार

राज्यांची कृषी विपणन संकेतस्थळे:

५५. मध्यप्रदेश राज्य कृषी विपणन बोर्ड
५६. आंध्रप्रदेश राज्य कृषी विपणन बोर्ड
५७. राजस्थान राज्य कृषी विपणन बोर्ड
५८. कर्नाटक राज्य कृषी विपणन बोर्ड
५९. तामिळनाडू राज्य कृषी विपणन बोर्ड
६०. पंजाब राज्य कृषी विपणन बोर्ड

राज्यांची कृषी विभाग संकेतस्थळे:

६१. कृषी विभाग आंध्रप्रदेश राज्य
६२. कृषी विभाग छत्तीसगढ राज्य
६३. कृषी विभाग कर्नाटक राज्य
६४. कृषी विभाग मध्यप्रदेश राज्य
६७. कृषी विभाग मेघालय राज्य
६८. कृषी विभाग केरळ राज्य
६९. कृषी विभाग नागा लँड राज्य
७०. कृषी विभाग ओरिसा राज्य
७१. कृषी विभाग तामिळनाडू राज्य
७२. कृषी विभाग उत्तरप्रदेश राज्य
७३. कृषी विभाग गुजरात राज्य
७४. कृषी विभाग राजस्थान राज्य
७५. कृषी विभाग आसाम राज्य
७६. कृषी विभाग बिहार राज्य
७७. कृषी विभाग मिझोरम राज्य
७८. कृषी विभाग त्रिपुरा राज्य
७९. कृषी विभाग अंदमान व निकोबार राज्य
८०. कृषी विभाग हरियाना राज्य

जर काही दुवे चुकेचे असतील अथवा काम करत नसतील तर कळविणे. अजून काही दुवे तुमच्याकडे असतील तर कळविणे.

जय भारत!

संबंधित लेख – महाराष्ट्र राज्य कृषी विज्ञान केंद्रांची यादी आणि महाराष्ट्र राज्य कृषी विषयक संकेतस्थळांची यादी

Tags: , , ,
Posted in मराठी, शेती | No Comments »

महाराष्ट्र राज्य कृषी विषयक संकेतस्थळांची यादी

Posted by Sandeep Shelke on 3rd September 2012

कृषी शिक्षण व संशोधन संस्था:

१. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद
२. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
३. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
४. मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
५. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

ऑनलाईन बाजार भाव:

१. कृषी पणन मंडळ
२. आजचा बाजारभाव
३. शेती माल माहिती
४. शेती देवाणघेवाण 

कृषी आकडेवारी:

१. कृषी गणना
२. पर्जन्यमान
३. पिक पेरणी
४. पिक सांख्यिकी

महत्त्वपूर्ण कृषी व्यावसायिक संस्था आणि योजना:

११. महाराष्ट्र शासन
१२. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ
१३. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज, अॅग्रीकल्चर
१४. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, अमरावती
१५. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, महाराष्ट्र राज्य
१६. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ
१७. छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ
१८. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित

जर काही दुवे चुकेचे असतील अथवा काम करत नसतील तर कळविणे. अजून काही दुवे तुमच्याकडे असतील तर कळविणे.

जय भारत!

संबंधित लेख – कृषी विज्ञान केंद्रांची यादी

Tags: , , , ,
Posted in मराठी, शेती | 7 Comments »

१९९५ पासून २०११ पर्यंत सरकारी आकड्यांनुसार २.९० लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Posted by Sandeep Shelke on 2nd September 2012

फक्त तुमच्या माहितीसाठी

देशात १९९५ पासून २०११ पर्यंत सरकारी आकड्यांनुसार २.९० लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. (Article in English). ह्या सरकारी आकड्यांमध्ये शेतमजूर, महिला शेतकरी ह्यांचा समावेश नाही.

ह्यात महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त म्हणजेच ५७८१८ आत्महत्या झाल्या, त्यानंतर क्रमांक येतो तो म्हणजे आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेश राज्यांचा. (Article in English)

भारतीय शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि अति प्रभावित राज्ये – इंग्रजी मध्ये आत्महत्यांचा तक्ता

जय भारत!

Tags: , , ,
Posted in भारत, मराठी, शेती | No Comments »

लवण वज्र: कृत्रिमरित्या पाऊस पडण्याचा प्रयोग

Posted by Sandeep Shelke on 2nd September 2012

पावसाच्या अभावामुळे महाराष्ट्राचा खूप मोठा प्रदेश टंचाईसदृश्य  परिस्थितीला समोर जातोय. अशातच सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे ग्रामीण भागातील शेतकरी समुदायाचा आणि जनावरांचा. म्हणून डॉ. श्री. राजा मराठे यांच्या लवण वज्र (स्रोत) प्रयोगावरून प्रेरित होऊन आम्ही आमच्या गावात सुद्धा कृत्रिमरित्या पाऊस पडण्याचा प्रयोग करायचे योजून स्वातंत्र्यदिनाचे औचित्य गाठायचे ठरविले.

त्यासाठी खालील गोष्टींची तयारी केली:
१. जाळण्याचे लाकडे ५ मन (२०० किलो)
२. दगडी(मोठे) मीठ १ मन (४० किलो)
३. घासलेट/केरोसीन/डीझेल १ लिटर
४. वापरलेले टायर जीप/मिनी-डूअरचे ४-५

आणि नैसर्गिकरित्या वातावरणाच्या तयारीची अपेक्षा ठेवली:
१. पावसाचे ढग येण्याची
२. आर्द्रता/हवेतील ओलावा मोठ्या प्रमाणावर होण्याची
३. वाऱ्याचा वेग मंद राहण्याची

प्रयोगाची जागा डोंगर पायथ्याशी निवडली कारण वाऱ्याला ऊर्ध्व प्रवाह प्राप्त होतो तसेच वाऱ्याचा वेगसुद्धा मर्यादित असतो. प्रयोग करण्यासाठी सूर्योदयाच्या मध्यान्हाच्या आणि सूर्यास्ताच्या आसपास १-१.३० तासाचा वेळ चांगला असतो कारण त्यावेळेस वाऱ्याचा वेग कमी असतो. ह्यापैकी ज्या वेळी वर सांगितल्या प्रमाणे वातावरण निर्मिती होईल त्या वेळी वर नमूद केलेल्या साधानंनिशी प्रयोगास खालील प्रमाणे सुरुवात करावी. आम्ही प्रयोग करताना तिन्ही वेळी मध्यान्हाच्या नंतरचीच वेळ निवडली कारण त्याच वेळी वातावरण थोड्या बहुत प्रमाणात अनुकूल मिळाले.

आम्ही सुरुवातीला आग पेटविली आणि आणि त्यामध्येच आग वाढविण्यासाठी एक टायर टाकले. आगीची तीव्रता वाढण्याची वाट पहिली म्हणजेच तापमान ३०० अंशांच्या वर जाण्याची कारण मीठ विरघळण्यासाठी तेवढ्या तापमानाची आवश्यकता असते. ढोबळमानाने जेव्हा वाटले कि आगीचे तापमान वाढले तेव्हा थोडेसे मीठ टाकून परीक्षा घेतली. हळूहळू आगीची तीव्रता वाढली आणि आम्ही एका-एकाने आली पळीने मिठाचा शिडकाव करायला सुरुवात केली. हा प्रयोग असाच जवळपास ९०-१०० मिनिटे चालला (ह्याच्या आधीचा एका छोटा प्रयोग कुठल्याही तयारीशिवाय १५-२० मिनिटांसाठी केला होता आणि त्याला चांगले यश मिळाले, पण त्यावेळेचे वातावरण खूपच पोषक होते किंतु वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे सगळे पाण्याचे ढग पटापट पुढे सरकले). ह्या प्रयोगाला पण यश मिळाले परंतु खूपच कमी प्रमाणात, कारण पावसाचे आगमन फार थोड्या क्षेत्रावर आणि प्रमाणावर झाले.

प्रयोगाचे निवडक छायाचित्रे:

ह्या नंतर आम्ही अजून एक प्रयोग केला आणि तो सुद्धा तुरळक सारी देऊन गेला. ह्या सर्व प्रयोगाचे फलित म्हणजे आम्हाला हा विश्वास मिळाला कि अशा रीतीने पाऊस पडू शकतो आणि जर अजून शास्त्रीय पद्धतीने केले तर यशही मोठ्या प्रमाणावर मिळेल.

ह्या चालू महिन्यात देखील एक प्रयोग शास्त्रीय पद्धतीने आणि अनुभवी लोकांच्या सहाय्याने करायचा मानस आहे.

जय भारत!

Tags: , , , ,
Posted in मराठी, शेती | No Comments »

 
%d bloggers like this: