कृषी देश

एक विचार, एक प्रवास!!

  • Categories

  • Google Ad

Archive for the 'अभंग' Category

स्त्रीजन्माचे दुखः

Posted by Sandeep Shelke on 16th December 2014

ज्या वेद-पुराणांची हाकाटी काही कर्मठ मंडळी सतत हाकत असतात त्यांच्यासाठी स्त्रीजन्माचे दुखः बहिणाबाईंच्या अभंगातून.

वेद देती हाका पुराणे गर्जती। स्त्रियेच्या संगती हित नोहे।।

मी तो सहजचि स्त्रियेचाचि देह। परमार्थाची सोय आता कैसी?

– बहिणाबाई

Tags: , ,
Posted in अभंग, मराठी | 1 Comment »

वृक्ष वल्ली आह्मां सोयरीं

Posted by Sandeep Shelke on 7th December 2014

तुकाराम महाराजांनी “वृक्ष वल्ली आह्मां सोयरीं” सुंदर अभंग रचला. आज आपल्या समाजाला निसर्गाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे, त्यावेळी शेकडो वर्षांपूर्वी तुकारामांनी निसर्ग आपला नातलग असल्याचा विचार मांडला होता.

वृक्षवल्लीवृक्ष वल्ली आह्मां सोयरीं वनचरें । पक्षी ही सुस्वरें आळविती ॥१॥

येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाहीं गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥

झाडे, वेली, वन्य पक्षी-प्राणी आम्हास नातलगांसमान आहेत, आणि पक्षीसुद्धा सुस्वरात आळवितात. एकांतवासात सुखं आपल्याशी येतात, आणि गुण-दोष अंगी लागत नाहीत.

आकाश मंडप पृथुवी आसन । रमे तेथें मन क्रीडा करी ॥२॥

आकाश हाच मांडव आणि धरणी हीच बसण्याची जागा, असे असेल तेथे मन रमते आणि क्रीडा करते.

कंथाकुमंडलु देहउपचारा । जाणवितो वारा अवश्वरु ॥३॥

अंगावरील चिंध्या, संसारातील भांडी हि देहाच्या उपचारासाठी आहे, परंतु वारा ह्या जीवनासाठी आवश्यक आहे.

हरिकथा भोजन परवडी विस्तार । करोनि प्रकार सेवूं रुची ॥४॥

वडाच्या पारावर हरिकथा भोजणादिक प्रकार करून गोडी ग्रहण करू.

तुका ह्मणे होय मनासी संवाद । आपुला चि वाद आपणांसी ॥५॥

तुकाराम महाराज सांगतात कि अशामुळे मनाशी संवाद होतो, आणि आपल्या मनातील कलह आपल्याशीच मर्यादित राहतो जो आपण एकांतात निवारू शकतो.

संबधित लेख:
श्रावणमासी हर्षमानसी,  ऐल तटावर पैल तटावर
Importance of wealth by Saint Tukaram Maharaj

Tags: , ,
Posted in अभंग, कविता, तुकाराम महाराज, भारत | 1 Comment »

संपत्तीचे महत्त्व – तुकाराम महाराज

Posted by Sandeep Shelke on 2nd August 2011

Here are few words of great revolutionary philosopher Saint Tukaram from Maharashtra, Bharat.This piece of words is known as “अभंग” (Abhanga) in Marathi which is “Hymn” in English.

धनवंतालागी । सर्वमान्यता आहे जगी ॥
माता पिता बंधू जन । सर्व मानिती वचन ॥
जव मोठा चाले धंदा । तंव बहिण म्हणे दादा ॥
सदा शृंगारभूषणे । कांता लवे बहुमाने ॥
तुका म्हणे धन । भाग्य अशाश्वत जाण ॥

Lose translation in English:

The wealthy person is recognized by all in the world
Mother, Father, Brother, public listen and respect your words
When business is growing  then sister too addresses respectfully
Provided clothing and ornaments always wife will treat honorably
Hence Tukaram says remember wealth is important and good luck is evanescent

The deep thinking showcased by Saint Tukaram is of a revolutionary thinker. In above hymn he outlines the importance of wealth when one is in this living world. He is encouraging us to earn wealth, of course, through right ways.

Jai Bharat!

संबधित लेख: वृक्ष वल्ली आह्मां सोयरीं

Tags: , , ,
Posted in अभंग, कविता, तुकाराम महाराज, मराठी | 5 Comments »

 
%d bloggers like this: