कृषी देश

एक विचार, एक प्रवास!!

  • Categories

  • Google Ad

मुखवटा

Posted by Mayuri Misal on January 8th, 2018

आज कॉलेजमध्ये काही भलताच प्रकार घडला. निखिल आणि अविनाशमध्ये अचानक बाचाबाची सुरू झाली, ती दोघे एकमेकांना ‘तू खोटा आहेस, तुझा चेहरा खोटा आहे’ अश्याप्रकरे एकमेकांना बोलू लागले. आणि यानंतर निखिल न माझं मन आणि डोक अडगळीच्या खोलीत बंद वाव तशी परिस्थिती होईल अस वावग बोलून गेला… ‘तू तुझ्यातल्या “मी”ला जगापासून लपवतोस’… आणि या वाक्यानंतर माझ डोक चालेना, हा “मी” कोण? आणि हा निखिल कोणत्या “मी”बद्दल बोलतोय? मला काही उमजेना,आणि याचा विचार करत माझी दुपार कशी ओलांडली मला कळलंच नाही.

घरी आल्यावर मी हाच विचार करत बसले की माझ्यामध्ये सुद्धा हा “मी” असेल का? पण या “मी”ची नक्की व्याख्या काय? डोक्याला थोडा ताण देऊन मी एका विचारावर पोहचले आणि माझ्या “मी” ची मी स्वतचं एक व्याख्या तयार केली. प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे एक व्यक्तिमत्त्व असते.त्याचे विचार, त्याचा कल्पना असतात, त्याची जीवनशैली या सर्व मुल्यांच्या आधारावर त्या व्यक्तीमधील “मी” तयार होतो. त्या ‘मी’ची जडणघडण होते. पण कोणताही व्यक्ती आपल्यातल्या “मी” ला कधीच कोणाचा दृष्टीस पडू देत नाही,त्याचातल्या “मी” ची जाणीव करून देत नाही. पण मग तो व्यक्ती जीवनात नक्की कोणत व्यक्तिमत्त्व घेऊन जगतो?

“मुखवटा”… माझ्यातल्या “मी” नेच मला आवाज दिला, आणि तो निर्धास्तपणे पुढे बोलू लागला… काय बरोबर ना!… हे ऐकुन माझं डोकं सुन्न पडलं. पण वेळेला सावरून मी त्याला प्रतिप्रश्न करायचं ठरवलं, आणि मी पुढे बोलू लागले… तू म्हणतोस की तो माणूस मुखवटा चडवून वावरत असतो;पण का?त्याला त्या मुखवट्याची गरज का पडते? वेळ न घालवता त्याने प्रतिउत्तर दिले… “मुखवटा घालून वावरणार व्यक्ती अनेक प्रकारची असतात,काही मी असा वागलो तर लोक काय म्हणतील, ते आपल्याबद्दल काय विचार करतील अश्या अनेक गोष्टींचा विचारांचा काहूर त्याचा मनात थान मांडून बसतो, अग हेच काय काही मध्यमवर्गीय लोकांमध्ये त्यांच्या सरळ आणि साध्या राहणीमानावरून देखील त्यांना त्यांच्यातील “मी”ला उच्च वर्गातील लोकांसमोर प्रदर्शित करण्यास कचरतात; का? तर उच्च वर्गातील लोकांचा राहणीमान त्यांची जीवन जगण्याची रीत हे पाहूनच त्यांचा “मी” काळोखात दडून बसतो आणि मग तो व्यक्ती जगासमोर एक नवीन आणि स्वतःपेक्षा वेगळा असा “मी” निर्माण करून त्या बनावट “मी” ची कास धरून वावरतो पण तो “मी” हा “मी” नसून एक बनावट मुखवटा आहे; ह्याची कल्पना त्याला असतेच पण ती कल्पना तो जगाला दाखून देत नाही”.

हे ऐकुन तर मी आधीपेक्षा जरा जास्तच सुन्न झाले.पण माझं डोकं यावर प्रतिउत्तर देण्यास नक्कीच तयार होत त्यामुळे मी वेळ न दवडता पुढे बोलू लागले… “पण मग जगात सगळीच माणसे असा विचार करत असतील अस मला तरी नाही वाटत कारण काही माणसे ही त्यांचा प्रत्येक क्षण मनमोकळ्यापणाने जगतात,आपला वर्ग काय, आपल राहणीमान काय याचा विचार नाही करत. त्यांना त्यांचा क्षण महत्वाचा वाटतो.मग, ती माणसे आपला “मी”लपवतात का? आणि लपवलाच तर त्या मागे कारण काय असू शकते? यावर मात्र माझं मन एक क्रूर्तेच हसू हसायला लागलं, आणि माझं बोलणं व्यर्थं आहे अस मला भासवू लागलं, आणि ते पुढे बोलू लागलें… “अग अशी माणसे ओळखू येणं कठीणच! पण मी एक मन आहे आणि मला चांगलच कळत की हा व्यक्ती नक्की का? आणि कसा? विचार करत असतो ते”…

(मी आता मात्र खूपच उत्साही झाले आणि यावर माझं मन काय बोलणार यावर लक्ष केंद्रित करू लागले.) अग अशा व्यक्तींचा “मी” हा त्यांची एक दुखरी बाजू असते,जी बाजू ते लोकांपासून बाहेरील दूनियापासून लपवून ठेवतात; का? तर त्यांच्या दु:खर्या बाजूवर कोणी बोट ठेऊ नये, कोणी त्यांच्या दुःखर्या बाजूला धक्का देऊ नये”. यावर माझ्या डोक्याची शंका ही स्पष्ठतेत उतरत होती. आणि, याची जाणीव माझा मनाला होत होती त्यामुळे माझा पुढें काही प्रश्न असेल, असे त्याला वाटत नसणार कदाचित; पण तरीही त्याने विचारले, “काय पटतय ना? यावर मी माझ्या मनाशीच कस खोटं बोलणार! शेवटी तो माझा “मी” आहे म्हटल्यावर तर खोटं बोलणे अशक्यच! त्यामुळे माझा शेवटचा आणि मुद्याचा प्रश्न मी विचारावा अस माझ्या बुद्धीला वाटले आणि मी तेच केले.

आणि माझा मनाला एक शेवटचा प्रश्न विचारला. “यावर निष्कर्ष काय?” पण बहुतेक माझा मनाला या प्रश्नाची जाणीव होतीच त्यामुळे तो येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला सज्ज होता. “यावर निष्कर्ष काढता येणं जरा कठीणच!कारण प्रत्येक माणसाचा जगण्याचा दृष्टीकोण हा ठरलेला असतो,त्याच रीतीने तो जगत असतो. त्यामुळे आपण त्याचा मुखवटा सारण हे त्याचा दृष्टिकोनातून चुकीचं आणि त्याचा जगण्याचा रीतीला ठेच पोहचविण्याचे कारण बनू शकते, त्यामुळे आपण आपली रीत सोडायची नाही, आणि कोणत्याच प्रकारचा मुखवटा आपल्याला धारण करावा लागेल अशी स्थिती निर्माण होऊ द्यायची नाही, काय बरोबर बोलतोय ना!

“त्याचा या बोलण्यावर मी एक स्मितहास्य देऊन,आणि होकारार्थी मान डोलवून माझ्या लेखणी आणि कागदाकडे एकटक पाहत राहिले.

Leave a Reply

XHTML: You can use these tags: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

 
%d bloggers like this: