कृषी देश

एक विचार, एक प्रवास!!

  • Categories

  • Google Ad

महाराष्ट्र ग्रामपंचायत : स्वरूप

Posted by Sandeep Shelke on October 7th, 2012

ग्रामपंचायत हा पंचायती राज चळवळीतील सर्वात महत्वाचा आणि मुलभूत घटक आहे. पंचायत समिती अथवा जिल्हा परिषद ह्यांच्या यशस्वी कारभारासाठी सक्षम आणि सुदृढ ग्रामपंचायत हि पहिली पायरी आहे किंबहुना त्यांच्या कार्याचा मुख्य उद्देशच आहे.

ग्रामपंचायतीचे स्वरूप:

ग्रामपंचायत म्हणून मान्यतेसाठी पठारी भागात किमान ५०० लोकसंख्या हवी तर डोंगरी भागात ३००.
ग्रामपंचायतीची सदस्यसंख्या लोकसंखेनुसार ७-१७ पैकी कितीही असू शकते.

लोकसंख्या                  सदस्यसंख्या
——————–          ————–

५००-१५००                   ०७

१५०१-३०००                ०९
३००१-४५००                ११
४५०१-६०००                १३
६००१-७५००                १५
७५०१ हून अधिक           १७

ग्रामपंचायत सदस्यांची निवड हि सार्वत्रिक गुप्त मतदान पद्धतीने होते.
ग्रामपंचायतीचा कालावधी हा ५ वर्षांचा असून अविश्वास ठरवणे ग्रामपंचायत बरखास्त करता येते.
ग्रामपंचायत निवडणूक जाहीर करण्यापूर्वी मतदार यादी आणि प्रभाग रचना निश्चिती प्रसिद्ध केली जाते.
एका प्रभागातून २/३ सदस्य निवडून येतात.
निवडणुकी नंतर जिल्हाधिकारी निवडलेल्या सदस्यांची नवे जाहीर करतात.

ग्रामपंचायत सदस्याच्या निवडणुकीसाठी अर्जदाराची अर्हता:

१. गावाचा रहिवासी असावा.
२. गावाच्या मतदार यादीत नाव असावे.
३. अर्जदाराचे वय २१ पूर्ण असावे.
४. आर्थिक दिवाळखोर नसावा.
५. वेडपट नसावा.
६. अस्पृश्यता कायद्याखाली दोषी नसावा.
७. सरकारी कर्मचारी नसावा.
८. ग्रामपंचायतीचा थकबाकीदार नसावा.
९. रु. ५०० अनामत रक्कम भरावी लागेल.
१०. अर्जदारासाठी कसलीही शैक्षणिक पात्रता लागू नाही.

आणि अति महत्त्वाचा नियम म्हणजे “भारताचा(च) नागरिक असावा”

मतपत्रिकांचा रंग:

पांढरा            – सर्वसाधारण
फिकट पिवळा – मागासवर्गीय
फिकट हिरवा  – अनुसूचित जमाती
फिकट गुलाबी – अनुसूचित जाती-जमाती

जय भारत!

संबधित लेख: महाराष्ट्र ग्रामपंचायत: कार्ये आणि तलाठी कार्यालयातील नोंदवह्या

Leave a Reply

XHTML: You can use these tags: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

 
%d bloggers like this: