Krishidesh

For Bharat and Bharati

Archive for July, 2012

पाणी व्यवस्थापन

Posted by Sandeep Shelke (संदीप शेळके) on 4th July 2012

दुष्काळ पडल्यावरच का नेहमी जाग येते? दुष्काळ पडू नये म्हणून काही करता नाही का येणार?

शेतकरी राजा स्वतःच पाण्याच्या नियोजनात मागे पडतोय. जर शेतकऱ्याला चांगले दिवस पाहायचे असतील त्यांनी एकत्र येऊन पाणी व्यवस्थापन करायला पाहिजे.

जसे,

१. भूगर्भातील पाणी कसे आणि किती वापरायचे,

२. पावसाचे वाहून जाणारे पाणी कसे अडवायचे,

३. कमी पाण्यावर शेती कशी करायची,

४. अनाठायी वाद न करता एकाच विहिरीतून जास्त लोकांनी पाणी कसे वापरायचे.

जर सगळे काही सरकार वर सोडून दिले तर लवकरच भिकारी/दरिद्री बनून फिरावे लागेल.

एकीकडे शेतकऱ्याला राजा म्हणायचे आणि दुसरीकडे शेतकर्यानेच सरकारी/निसर्ग आदींकडून दयेची अपेक्षा करायची हे संयुक्तिक नाही. शेतकरी हा विश्वाचा अन्नदाता आहे आणि त्याने स्वतःच स्वतःचे हित साधायला पाहिजे, कोणी दुसरा (राजकारणी, व्यापारी) त्यांचे हित कसे करणार तो स्वतःचेच हित साधणार.

टीप: मी पाणी व्यवस्थापनाच्या कुठल्याही कार्यात मदत करायला उत्सुक आहे.

जय भारत!

Tags: , ,
Posted in Agriculture of Bharat, Marathi | No Comments »

 
%d bloggers like this: