कृषी देश

एक विचार, एक प्रवास!!

  • Categories

  • Google Ad

Archive for February 18th, 2012

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विषयीचे सत्य

Posted by Sandeep Shelke on 18th February 2012

माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना सप्रेम नमस्कार.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीवरून अनेक वर्षांपासून काही लोक जाणीवपूर्वक घोळ घालत आहेत. त्यांचे म्हणणे आहे कि छ शिवाजी महाराजांचा जन्म “फाल्गुन वद्य ३, शके १५५१ ” म्हणजेच “१९ फेब्रुवारी १६३०” साली झाला आणि हे ०३ फेब्रुवारी २००० साली आघाडी सरकारने मान्य केले. विशेष म्हणजे ह्या तिथी साठी कुठलाही ठोस पुरावा अद्याप उपलब्द्ध नाही (इथुनपुढे निर्माण केला जाऊ शकतो). त्याच्यावर ज्या युती शासनाने विधानसभेत ठराव मांडला होता आणि “१९ फेब्रुवारी १६३०” साठी रेटा लावला होता त्यांनी लगेचच घुमजाव करीत तिथीप्रमाणे जयंती साजरी करण्याचा कांगावा सुरु केला. दुसरीकडे अगदी १९९९ पर्यंत छ शिवाजी महाराजांची जयंती “वैशाख शुद्ध ३ – अक्षयतृतीया-, शके १५४९” म्हणजेच ०८ एप्रिल १६२७ अशीच साजरी केली जात असे आणि तसे ठोस पुरावेसुद्धा उपलब्ध आहेत.

आता मला खात्रीनुसार शिवाजी महाराजांच्या जन्म तिथीविषयी काहीही शंका वाटत नाही कारण मी श्री अनंत दारवटकरांनी लिहिलेले “अद्वितीय छ. संभाजी महाराज” ह्या पुस्तकातील शिवजन्मतिथी विषयीचे अभ्यासपूर्ण लिखाण वाचले आणि त्याने माझे डोळे लख्ख उघडले.

खालील सर्व माहिती मी श्री. अनंत दारवटकरांनी लिहिलेले “अद्वितीय छ. संभाजी महाराज” ह्या पुस्तकातून घेतली आहे:

१. सुर्यवंश (शिवभारत): ह्या ग्रंथातील श्लोक २६ ते ३१ नुसार छ शिवाजी महाराजांचा जन्म “वैशाख शुद्ध ३ – अक्षय तृतीया -, शके १५४९” म्हणजेच ०८ एप्रिल १६२७ साली झाला आहे.

२. शिवदिग्विजय: ह्या ग्रंथातील ३ श्लोक छ शिवाजी महाराजांचा जन्म “प्रभव संवत्सर, शके १५४९, वैशाख शुद्ध ३, रोहिणी नक्षत्र, रविवार, सूर्योदय” ह्या तिथीचाच असल्याची माहिती नमूद करतात.

३. १२ बखरी: जवळपास बाराच्या बारा बखरी छ शिवाजी महाराजांचा जन्म “प्रभव संवत्सर, शके १५४९” असल्याचे नमूद करतात, तर त्यातील ९ बखरी “वैशाख शुक्ल” असल्याचे नमूद करतात. एकूण पाहता ९ बखरी “प्रभव संवत्सर, शके १५४९, वैशाख शुद्ध २(३, ४, ५)” अशी तिथी नमूद करतात.

वरील पुराव्यांकडे बारकाईने पाहिल्यास आढळते कि सुर्यवंश(शिवभारत) आणि शिवदिग्विजय ह्या, निर्विवाद छ शिवाजी महाराजांच्या समकालीन, ग्रंथांमध्ये त्यांच्या जन्मतिथीविषयी एकवाक्यता आहे. आणि बखरकारांनी दिलेली माहिती हि सर्वसाधारणपणे दोन्हीही ग्रंथांमधील माहितीशी सुसंगत आहे. म्हणून छ शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारी १६३० न मानता ०८ एप्रिल १६२७ हीच मानावी आणि मोठ्या उत्साहाने त्यांच्या चरित्रकथा गात साजरी करावी.

पण ह्या सर्व जयंतीच्या वादामध्ये मुख्य प्रश्न आहे कि हा वाद का निर्माण केला? कोणी निर्माण केला? आणि कधी पासून निर्माण केला? ह्या सर्व प्रश्नांना उत्तर शोधण्याचे प्रयत्न श्री अनंत दारवटकरांनी “अद्वितीय छ. संभाजी महाराज” ह्या पुस्तकामधून केला आहे. कृपया सर्वांनी, विशेषतः इतिहास प्रेमींनी, श्री अनंत दारवटकरांनी लिहिलेले “अद्वितीय छ. संभाजी महाराज” ह्या पुस्तकांचे सर्व खंड वाचावेत.

जय भवानी ! जय शिवाजी !

जय भारत!

Tags: , , , , , ,
Posted in इतिहास, भारत, राजकारण, शिवाजी | 4 Comments »

Quotes of life-time by the legend CHANAKYA (KAUTILYA)

Posted by Sandeep Shelke on 18th February 2012

॥ अर्थ एवं प्रधान ॥ – इति कौटिल्य

Wealth is prime in life – Kautilya (Chanakya)

॥ धर्मस्य मूलम् अर्थ: ॥ – इति कौटिल्य

Wealth is base of ‘Dharma’ – Kautilya (Chanakya)

 

जय माँ भारती ।

Tags: , , ,
Posted in इतिहास, माझे विचार, राजकारण, संस्कृत, हिंदू | 1 Comment »

महाराष्ट्रातील १० महानगर पालिकांच्या निवडणुकांचे निकाल

Posted by Sandeep Shelke on 18th February 2012

महाराष्ट्रातील १० महानगर पालिकांच्या निवडणुकांचे निकाल:


मुंबई (२२७) ठाणे (१३०) पुणे (१५२) नाशिक (१२२) नागपूर (१४५) उल्हासनगर (७८) पिंपरी-चिंचवड (१२८) अकोला (७३) सोलापूर (१०२) अमरावती (८७) एकूण
काँग्रेस ५० १८
२८
१५ ४१ १५
१८
४५ २५
२६३
राष्ट्रवादी १४ ३४ ५२ २० २० ८४
१६
17 २६७
शिवसेना ७५ ५३ १६ १९ १९
१३


२२६
भाजप ३१
२४ १४
६२ ११

१८
२५

२०४
रिपाइं
१५
मनसे २८
२९ ४०
११५
इतर २८

११ २६
१५

२३
२५
१५७
एकूण २२७
१३०
१५२
१२२
१४५
७८
१२८
७३
१०२
८७
१२४४

 

पक्षीय बलाबल आणि कोण सत्ता स्थापणार:

मुंबई (२२७) ठाणे (१३०) पुणे (१५२) नाशिक (१२२) नागपूर (१४५) उल्हासनगर (७८) पिंपरी-चिंचवड (१२८) अकोला (७३) सोलापूर (१०२) अमरावती (८७) एकूण
शिवसेना + भाजप + रिपाइं १०७ ६२
४२ ३६ ६८ ३४
१७ २६
३३ २०
४४५
राष्ट्रवादी + काँग्रेस ६४ ५२
८० ३५ ४६ २८
९९ २३
६१ ४२
५३०
मनसे २८

२९
४०


११५
इतर २८


११
२६ १५

२३

२५
१५४
एकूण २२७
१३०
१५२
१२२
१४५
७८
१२८
७३
१०२
८७
१२४४

 

जय भारत!

Tags: , , , , ,
Posted in भारत | No Comments »

 
%d bloggers like this: