कृषी देश

एक विचार, एक प्रवास!!

  • Categories

  • Google Ad

Archive for September 17th, 2011

व्यवसायिकतेचे धडे

Posted by Sandeep Shelke on 17th September 2011

व्यवसायिकता

धडा १: तुमच्या मालाच्या/कामाच्या मागणीचा आढावा नक्की घ्या.

तुमच्या ग्राहकाला गृहीत धरू नका. भारतीय ग्राहक खूप जागरूक आणि चोखंदळ आहे.


धडा २: ध्येय आणि उद्दिष्टे स्पष्ट असावेत.

कुठलाही व्यवसाय घाई-घाईत सुरु करू नका. आणि तुमच्या मनाला वाटतं यशस्वी होईल म्हणून तर मुळीच करू नका. तात्पुरत्या नफ्याकडे पाहून दूरदृष्टी सोडू नका. अति घाई संकटात नेई.


धडा ३: लहानातून मोठ्याकडे.

म्हणजेच सुरुवातीलाच जागा, उंची सरंजाम ह्यांच्या नादी लागू नका. गरजेपेक्षा जास्त मोठी जागा भाड्याने अथवा विकत घेऊ नका. सरसकट गुंतवणुकीपेक्षा खेळतं भांडवल असू द्या. काटकसरीने खर्च करा.


धडा ४: तुमचे चित्त ध्येयाशी संलग्न असावे आणि कृती उद्दिष्ठांशी.

कुठलेही काम फक्त तात्पुरती आर्थिक कोंडी सोडविण्यासाठी स्वीकारू नका. ध्येय आणि उद्दिष्ट्यांवर लक्ष केंद्रित करून तुमच्या कामाची ओळख निर्माण करा. ध्येयाशी कधीच व्यभिचार करू नका.


धडा ५: तुमचे ध्येय सहज साध्य होतील अशा लहान गटांमध्ये विभागून त्यासाठी कार्यपूर्ती काळ नियोजित करा.

लहान उद्देश सहज साध्य होतात आणि त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. आकडेवारी मध्ये गुंतून राहू नका तो स्वप्नवत खेळ असतो. त्यामुळे लक्ष लहान ध्येयांवर केंद्रित करा.


धडा ६: स्वतःची बलस्थानं आणि कमजोरींची माहिती असू द्या.

तुमच्या व्यवसायासाठी काय गरजेचे आहे ते शोधून काढा. नंतर तुम्हाला काय येते आणि काय येत नाही ह्याची यादी तयार करा. भविष्यात होऊ शकण्यारे बदल आणि वाढणाऱ्या गरजांची माहिती ठेवा.


धडा ७: स्वतःचा अमुल्य वेळ येत नसलेल्या गोष्टींमध्ये दवडू नका, ताबडतोब तज्ञांची/जाणकारांची मदत घ्या.

सगळ्याच गोष्टी आपल्याला येत नसतात आणि त्या करण्याचा प्रयत्न म्हणजे मोठ्या प्रमाणावर वेळ वाया घालविणे. फक्त माहिती असू द्या म्हणजे कोणी फसविणार नाही. व्यावसायिकता म्हणजे प्रभावी पद्धतीने आणि पूर्ण कार्यक्षमतेने गोष्टी पूर्णत्वास नेणे.


धडा ८: अंतर्गत दबाव असू नये.

वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक दबाव असता कामा नये. नाही तर मुख्य कर्म राहते बाजूला आणि अशा फुटकळ गोष्टी संपूर्ण उर्जा वाया घालवितात.


धडा ९: जगणूक आणि स्वयं आधार प्रथम.

कमीत कमी ६ महिन्याच्या खर्चासाठीची बचत गाठीला असावी. त्यामुळे तुमचे दैनंदिन वैयक्तिक आणि कौटुंबिक खर्चाचे ओझे तुम्हाला जाणवणार नाही.


धडा १०: कोणाचीतरी वाट पाहण्यात वेळ दवडू नका.

मदतीसाठी कोणीतरी येईल ह्याची वाट पाहण्यात अजिबात वेळ व्यर्थ घालवू नका. लोकांशी बोला, चर्चा करा आणि त्यानुसार तुमच्या सद्सद विवेकबुद्धीने निर्णय घ्या. निर्णय सर्वस्वी स्वतःचा असावा. सल्ला ऐकून वापरायचा कि नाही हे स्वतः ठरावा.

नोंद: स्वानुभवातून

जय भारत!

इंग्रजी मधील लेख Entrepreneurship Lessons

Tags: , , , , , , ,
Posted in उद्यम व्यवसायिकता, मराठी | 1 Comment »

 
%d bloggers like this: