कृषी देश

एक विचार, एक प्रवास!!

 • Categories

 • Google Ad

सुसंस्कृत(?) पुणे शहर!

Posted by Sandeep Shelke on August 21st, 2011

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त संपूर्ण शहरभर दहीहंडीच्या कार्यक्रमाबद्दल वेगवेगळ्या संघटनांचे जाहिरात फलक लागलेले आहेत. ह्या संघटनांचे संस्कृतीप्रेम पाहून खरंतर कौतुक वाटायला पाहिजे, पण तसे काही होताना दिसत नाही. काय कारण असावे बरं? खाली दिलेली छायाचित्रे पहा तुम्हाला कळेल मला काय म्हणायचे आहे ते.

जाकलीन फर्नांडीज, करिष्मा कपूर, झरीन खान, दिपाली सय्यद, सोनाली कुलकर्णी, क्रांती रेडकर, आणि इतर सिने तारका अगदी वितभर कपडे घालून जन्माष्टमीच्या दहीहंडीची जाहिरात करताना दिसत आहेत. हा बिभस्तपणा इथेच थांबला तर बरे पण ह्या तारका तर दहीहंडीच्या विशेष आकर्षण आहेत. आश्चर्य आहे ना? श्रीकृष्णाच्या दहीहंडीचे आकर्षण कमी आहे? म्हणून ह्या अर्धनग्न तारका हव्या आहेत आकर्षित करण्यासाठी.

हे सगळे संस्कृतीप्रेमी खरे तर संस्कृती आणि सणावारांचे धिंडवडे काढीत आहेत. कर्णकर्कश आवाजात अश्लील गाणी लावायची आणि जन्माष्टमी, गणेशोत्सवा सारख्या पवित्र कार्यांचे पावित्र्य पायदळी तुडवायचे हि वृत्ती बोकाळली आहे. गेल्या वर्षी मुंबई मध्ये एका मॉडेल ने चक्क दहीहंडीला दारूने अंघोळ घातली होती [ह्या बातमीचा दुवा सापडला नाही पण मिळाला कि टाकीन इकडे].

जय भारत!

6 Responses to “सुसंस्कृत(?) पुणे शहर!”

 1. BinaryBandya™ Says:

  दहीहंडी उत्सव म्हणून साजरा करा स्पर्धा म्हणून नको (असे मी एका कार्यक्रमात ऐकले)…
  पण आजकालचे उत्सव हे उत्सव नसतातच . ते कुठल्या तरी राजकीय पक्ष , जातीयवादी संघटना ह्यांचे व्यासपीठ असते .
  आमच्या इथे मुलींची दहीहंडी असणार आहे .
  मला खात्री आहे तिथे मुलींचा पराक्रम बघण्यासाठी नाही तर मुलीना बघण्यासाठीच गर्दी होणार …

 2. BinaryBandya™ Says:

  आणि हो हे फक्त पुण्यातले चित्र नाही . सगळीकडे हेच आहे ..
  पुणे लाख सुसंस्कृत असेल. इथले नेतृत्व- नेते नको का ?

 3. संदीप नारायण शेळके Says:

  @बायनरीबंड्या
  पण हेच तथाकथित पुण्याचे सुसंस्कृत लोकाचा ह्यांना निवडून देतायेत ना?
  पण हे अगदी बरोबर आहे कि असे चित्र फक्त पुण्यातच नाहीये जवळपास गावागावापर्यंत हि घाण पोहोचली आहे.
  कुंपणाच शेत खात असेल तर दोष कोण दुसर्याला देण्याचे कारण नाही.

  जय भारत!

 4. Sanjeev Says:

  तारकांची गरज दहीहंडी पेक्षा आयोजकांनाच दिसते आहे, निदान चित्रात तरी..

 5. संदीप नारायण शेळके Says:

  @संजीव सर,
  अगदी बरोबर. मला मिळालेल्या माहितीनुसार काल जेव्हा करिष्मा कपूर भोसरीच्या “युवा प्रतिष्ठान” च्या पूर्वनियोजित दही हंडीला आली नाही तर बहाद्दरांनी चीअरगर्ल नाचविल्या आणि त्याही “बिडी जलय ले”, “मुन्नी बदनाम हुई”, “शीला कि जवानी”, “जलेबी बाई” आदी गाण्यांवर. आणि माहिती हीपण आहे कि त्यावेळी शिरूर मतदार संघाचे खासदार श्री आढळराव पाटील उपस्थित प्रेक्षकांना हात हलवून अभिवादन करीत होते.
  विलक्षण कुलाक्षणी आहेत हि लोकं.

  जय भारत!

 6. Siddharth Soshte Says:

  नशिब खासदार पाटील हातच हालवून अभिनंदन करत होते, नाहितर या राजकारण्यांच्या भरवसा देता येत नाही.. 🙂

Leave a Reply

XHTML: You can use these tags: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

 
%d bloggers like this: