कृषी देश

एक विचार, एक प्रवास!!

  • Categories

  • Google Ad

निसतच म्हणतो धरणी माय

Posted by Sandeep Shelke on April 4th, 2011

अरं धरणी मातेचं रडनं अन दुखनं समजून घे मेरे भाय ।

निसतच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय ॥

दिसल ती जमीन कसून घेतो रस समदा शोषून घेतो ।

माय मरू दे, माय मरू दे, फायद्याची सामाद्यांनाच झाली घाय ॥

निसतच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय ॥

कारखान्याच्या चिमणीतून काळा धूर भस्सा भस्सा वरतून समदं पेटत चाललंय खालून पाण्याचा उपसा ।

वर्षाची बारा महिनं कडक उन्हात जाय ॥

निसतच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय ॥

ग्लोबल वार्मिंग वाले म्हणत्यात हळू जरा धीर आम्हाला काहीच ऐकू येत नाही कान आमचे बधीर ।

अरं तापत चालायचं धरणी मायाच डोक,  छाती, पोट अन पाय ॥

निसतच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय ॥

असंच चालू राहिलं तर आपली काय खैर नाय उद्या चालून आपलं पोरगं विचारल “बाबा बाबा हिरवळ म्हंजी काय” ।

अरं उठ, अरं उठ वाचवं आपल्या आईला झटकून हात अन पाय ॥

निसतच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय ॥

स्रोत: हुप्पा हुय्या

जय भारत!

Leave a Reply

XHTML: You can use these tags: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

%d bloggers like this: