कृषी देश

एक विचार, एक प्रवास!!

  • Categories

  • Google Ad

Archive for March 5th, 2011

हा देश कोणाचा आणि इथली मानसं आहेत तरी कोण

Posted by Sandeep Shelke on 5th March 2011

जेव्हा क्रिकेटच्या भाकऱ्या भाजणारे मला सापडले पण देश ओरबाडला जात असताना ब्र शब्दही न बोलणारे आढळले तेव्हा मला खालील काही ओळी सुचल्या.

हा देश कोणाचा आणि इथली मानसं आहेत तरी कोण
ज्यांना नाही कसलीच जान, झाले जरी देशाचे स्मशान

बघूनही दिसत आणि ऐकूनही कळत नाही, असली ह्यांची जात
टाहो फोडते आहे जननी तरीही चकाट्या पिटती दाही दिशांत

काहींना काळजी सचिनच्या शतकाची तर काहींना क्रिकेटमधल्या जयाची
असे-कसे रे संवेदनाहीन तुम्ही पर्वा नाही मानवतेची कि जीवनाची

भ्रष्ट, लुटारू, खोटारड्या आणि देश-विघातक्यांचा वाढतोय जोर
अंधकारमय भवितव्य असताना राहू कसे शकता तुम्ही बिनघोर

गरज आहे फ़क़्त जागे होऊन बघण्याची आणि जबाबदारी स्विकारण्याची
वेळ आली आहे ति निर्धार करून शत्रूवर पुरता हल्ला चढविण्याची

उतरवून फेका डोळ्यावरील दुंधीची चादर, झुगारून टाका सारे पाश
हीच वेळ आहे मोक्याची अन्यथा अटळ  आहे आपला सर्वनाश

दुष्टप्रवृत्ती विरोधातील लढ्यात आपुल्याला बळ देईल भवानी माता
भान राहूदे तुज मावळ्या गानिमाशी शिवबासवे लढली अवघी जनता

-राष्ट्रप्रेमी

Tags: , , , , ,
Posted in कविता, शेती | No Comments »

 
%d bloggers like this: