कृषी देश

एक विचार, एक प्रवास!!

  • Categories

  • Google Ad

मुखवटा

Posted by Mayuri Misal on January 8th, 2018

आज कॉलेजमध्ये काही भलताच प्रकार घडला. निखिल आणि अविनाशमध्ये अचानक बाचाबाची सुरू झाली, ती दोघे एकमेकांना ‘तू खोटा आहेस, तुझा चेहरा खोटा आहे’ अश्याप्रकरे एकमेकांना बोलू लागले. आणि यानंतर निखिल न माझं मन आणि डोक अडगळीच्या खोलीत बंद वाव तशी परिस्थिती होईल अस वावग बोलून गेला… ‘तू तुझ्यातल्या “मी”ला जगापासून लपवतोस’… आणि या वाक्यानंतर माझ डोक चालेना, हा “मी” कोण? आणि हा निखिल कोणत्या “मी”बद्दल बोलतोय? मला काही उमजेना,आणि याचा विचार करत माझी दुपार कशी ओलांडली मला कळलंच नाही.

घरी आल्यावर मी हाच विचार करत बसले की माझ्यामध्ये सुद्धा हा “मी” असेल का? पण या “मी”ची नक्की व्याख्या काय? डोक्याला थोडा ताण देऊन मी एका विचारावर पोहचले आणि माझ्या “मी” ची मी स्वतचं एक व्याख्या तयार केली. प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे एक व्यक्तिमत्त्व असते.त्याचे विचार, त्याचा कल्पना असतात, त्याची जीवनशैली या सर्व मुल्यांच्या आधारावर त्या व्यक्तीमधील “मी” तयार होतो. त्या ‘मी’ची जडणघडण होते. पण कोणताही व्यक्ती आपल्यातल्या “मी” ला कधीच कोणाचा दृष्टीस पडू देत नाही,त्याचातल्या “मी” ची जाणीव करून देत नाही. पण मग तो व्यक्ती जीवनात नक्की कोणत व्यक्तिमत्त्व घेऊन जगतो?

“मुखवटा”… माझ्यातल्या “मी” नेच मला आवाज दिला, आणि तो निर्धास्तपणे पुढे बोलू लागला… काय बरोबर ना!… हे ऐकुन माझं डोकं सुन्न पडलं. पण वेळेला सावरून मी त्याला प्रतिप्रश्न करायचं ठरवलं, आणि मी पुढे बोलू लागले… तू म्हणतोस की तो माणूस मुखवटा चडवून वावरत असतो;पण का?त्याला त्या मुखवट्याची गरज का पडते? वेळ न घालवता त्याने प्रतिउत्तर दिले… “मुखवटा घालून वावरणार व्यक्ती अनेक प्रकारची असतात,काही मी असा वागलो तर लोक काय म्हणतील, ते आपल्याबद्दल काय विचार करतील अश्या अनेक गोष्टींचा विचारांचा काहूर त्याचा मनात थान मांडून बसतो, अग हेच काय काही मध्यमवर्गीय लोकांमध्ये त्यांच्या सरळ आणि साध्या राहणीमानावरून देखील त्यांना त्यांच्यातील “मी”ला उच्च वर्गातील लोकांसमोर प्रदर्शित करण्यास कचरतात; का? तर उच्च वर्गातील लोकांचा राहणीमान त्यांची जीवन जगण्याची रीत हे पाहूनच त्यांचा “मी” काळोखात दडून बसतो आणि मग तो व्यक्ती जगासमोर एक नवीन आणि स्वतःपेक्षा वेगळा असा “मी” निर्माण करून त्या बनावट “मी” ची कास धरून वावरतो पण तो “मी” हा “मी” नसून एक बनावट मुखवटा आहे; ह्याची कल्पना त्याला असतेच पण ती कल्पना तो जगाला दाखून देत नाही”.

हे ऐकुन तर मी आधीपेक्षा जरा जास्तच सुन्न झाले.पण माझं डोकं यावर प्रतिउत्तर देण्यास नक्कीच तयार होत त्यामुळे मी वेळ न दवडता पुढे बोलू लागले… “पण मग जगात सगळीच माणसे असा विचार करत असतील अस मला तरी नाही वाटत कारण काही माणसे ही त्यांचा प्रत्येक क्षण मनमोकळ्यापणाने जगतात,आपला वर्ग काय, आपल राहणीमान काय याचा विचार नाही करत. त्यांना त्यांचा क्षण महत्वाचा वाटतो.मग, ती माणसे आपला “मी”लपवतात का? आणि लपवलाच तर त्या मागे कारण काय असू शकते? यावर मात्र माझं मन एक क्रूर्तेच हसू हसायला लागलं, आणि माझं बोलणं व्यर्थं आहे अस मला भासवू लागलं, आणि ते पुढे बोलू लागलें… “अग अशी माणसे ओळखू येणं कठीणच! पण मी एक मन आहे आणि मला चांगलच कळत की हा व्यक्ती नक्की का? आणि कसा? विचार करत असतो ते”…

(मी आता मात्र खूपच उत्साही झाले आणि यावर माझं मन काय बोलणार यावर लक्ष केंद्रित करू लागले.) अग अशा व्यक्तींचा “मी” हा त्यांची एक दुखरी बाजू असते,जी बाजू ते लोकांपासून बाहेरील दूनियापासून लपवून ठेवतात; का? तर त्यांच्या दु:खर्या बाजूवर कोणी बोट ठेऊ नये, कोणी त्यांच्या दुःखर्या बाजूला धक्का देऊ नये”. यावर माझ्या डोक्याची शंका ही स्पष्ठतेत उतरत होती. आणि, याची जाणीव माझा मनाला होत होती त्यामुळे माझा पुढें काही प्रश्न असेल, असे त्याला वाटत नसणार कदाचित; पण तरीही त्याने विचारले, “काय पटतय ना? यावर मी माझ्या मनाशीच कस खोटं बोलणार! शेवटी तो माझा “मी” आहे म्हटल्यावर तर खोटं बोलणे अशक्यच! त्यामुळे माझा शेवटचा आणि मुद्याचा प्रश्न मी विचारावा अस माझ्या बुद्धीला वाटले आणि मी तेच केले.

आणि माझा मनाला एक शेवटचा प्रश्न विचारला. “यावर निष्कर्ष काय?” पण बहुतेक माझा मनाला या प्रश्नाची जाणीव होतीच त्यामुळे तो येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला सज्ज होता. “यावर निष्कर्ष काढता येणं जरा कठीणच!कारण प्रत्येक माणसाचा जगण्याचा दृष्टीकोण हा ठरलेला असतो,त्याच रीतीने तो जगत असतो. त्यामुळे आपण त्याचा मुखवटा सारण हे त्याचा दृष्टिकोनातून चुकीचं आणि त्याचा जगण्याचा रीतीला ठेच पोहचविण्याचे कारण बनू शकते, त्यामुळे आपण आपली रीत सोडायची नाही, आणि कोणत्याच प्रकारचा मुखवटा आपल्याला धारण करावा लागेल अशी स्थिती निर्माण होऊ द्यायची नाही, काय बरोबर बोलतोय ना!

“त्याचा या बोलण्यावर मी एक स्मितहास्य देऊन,आणि होकारार्थी मान डोलवून माझ्या लेखणी आणि कागदाकडे एकटक पाहत राहिले.

Posted in भारत, माझे विचार | No Comments »

असहिष्णुतेचे अवडंबर, थोतांड? कसला असुरी आनंद घेता नाचक्की करून?

Posted by Sandeep Shelke on November 24th, 2015

सर्वात प्रथम मोदी किंवा भाजप म्हणजे भारत नाही.

मोदीवर, भाजपवर जी टीका करायची ती करा. पण आमच्या टाळूवरचे लोणी खाऊन दंगली करायला धष्टपुष्ट झालेल्यांनी भारतावर म्हणजेच सामान्य भारतीयांवर असहिष्णुतेचा आरोप करण्यापूर्वी एकदा स्वतःला विचरावे कि हे चूक कि बरोबर.

कोणी कोणी येतोय संघ म्हनजे आईसीस असं म्हणतो. बिनधास्त म्हणा. पण विचार करा जर खरच संघाने आईसीस सारखी मारामारी आणि मुंडकी कापायला, बलात्कार करायला सुरुवात केली तर आपल्यालाच बंदुका घेऊन लढावे लागेल. ज्याला तुम्ही शत्रू समजून असल्या कल्पना देत आहात त्यातल्याच काही लोकांनी चिडून अशी चूक केली तर किती महागात पडेल (कारण हेच सिकुलर म्हणतात कि इस्लामिक जिहादी दहशतवादी त्यांच्यावर लय दबाव नि खोटे आरोप नि अत्याचार झाला म्हणून तयार होतात). त्यामुळे आपण काय मागतो तेच निसर्ग/देव आपल्याला देतो.

सरकारवर टीका करण्यापेक्षा कारभारावर करा ना राव. मेंदूत सागरगोटे अडकले आहेत का?

असहिष्णुतेचे अवडंबर, थोतांड

असहिष्णुतेचे अवडंबर, थोतांड

मुळातच ते संविधान असहिष्णू आहे.
– त्याला समलिंगी लोकं नाही चालत
– एका राज्याला एक नियम तर दुसऱ्या राज्याला दुसरा नियम
– जातीवर आधारित व्यवस्था तयार करून ठेवली आहे
– गायीला विशेष दर्जा देऊन बैल, म्हस, रेडे, कुत्रे, आदी जनावरांवर अन्याय, सगळ्यात जास्त त्या बोकड व कोंबडीवर त्यांना कुणीच वाचवत नाही सगळेच खातात.
– अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाहीच त्याच्यामध्ये
– समान न्याय मिळत नाही (सबका न्याय समान न्याय व्यवस्था असल्याशिवाय नाही मिळणार मोदी साहेब 😉 )

स्वतः डॉ आंबेडकर म्हणाले होते कि असल्या संविधानाचा जाळ केला पाहिजे. (पटत नसेल तर राज्यसभेच्या जुन्या चर्चा वाचा १९५२-५३ सालची आंध्रप्रदेश विषयावरची चर्चा आहे)

हे सगळे त्या नेहरूंने तयार केले. त्यावर एक पण मायचा लाल आला नाही कि ज्याने मुलभूत प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला. मोदी पण काही वेगळे नाही.

परंतु यांच्या सत्तेच्या भांडणात आम्हा देशवासियांना यातना. कांग्रेस ने मुसलमान दलित अशा गोष्टी राजकारणात इतक्या रुजवल्या कि पर्यायी मतदार म्हणून भाजप हिंदुत्व करत बोंबलू लागला.

मनमोहन सिंग: देशावर पहिला हक्क अल्पसंख्य समाजाचा (आम्ही काय सावत्र आईचे आहोत का?)
मोदी: आम्ही राम मंदिर बांधणार (खुशाल, आमच्या पोटात तोवर आम्ही बिबे घालतो)

भोकात जा लेकांनो. देशाला परिणामी प्रतिनिधीरहित देशवासियांना नावे ठेवल्याने, जगभरात आमची नाचक्की करून काय मिळते? कसला असुरी आनंद घेता?

बोला चांगभलं असहिष्णुतेच्या नावाने चांगभलं.

Tags: ,
Posted in आंबेडकर, आतंकवाद, माझे विचार | No Comments »

श्री शरद पवार हे पंतप्रधान मान्य शेतकरी नेते

Posted by Sandeep Shelke on February 14th, 2015

१४ फेब्रुवारी २०१५ रोजी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी श्री शरद पवार यांना नेहमी शेतकऱ्यांचा विचार करणारे नेते अशी पदवी बहाल केली आणि सोबत प्रमाणपत्र सुद्धा दिले. त्यामुळे आजपासून श्री शरद पवार हे पंतप्रधान मान्य शेतकरी नेते होत. याची कृपया सर्व देशवासीयांनी आणि विशेतः मराठी माणसाने नोंद घ्यावी.

केवढा मोठा नेता आहे आणि उगीच आपण सगळे त्याला नावं ठेवत होतो. परंतु श्री मोदी यांनी सर्व भ्रम दूर केले आहेत. तरीही देशातील सर्व भाजपच्या नेत्यांनी याची नोंद घ्यावी कि इथून पुढं श्री शरद पवार यांच्यावर कधीही शेतकरी विरोधी नेते आहेत असा आरोप करू नये, आणि कुणी केला तर ढुंगणावर ओल्या फोकाने फटके देण्यात यावेत अशी मी श्री नरेंद्र मोदी यांच्या कडे विशेष विनंती करतो.

शरद पवार आणि नरेंद्र मोदी सौजन्य: लोकमत
शरद पवार आणि नरेंद्र मोदी
सौजन्य: लोकमत

संत वेलेन्टाईन यांच्या दिनविशेष निमित्त श्री  मोदी यांनी इतिहासातील उल्लेखनीय राजनेते कथा स्थापन करून त्यांच्या समस्त पाठींबा देणाऱ्यांच्या डोळ्याचं पारणं फेडले आहे. आणि श्री मोदी यांच्या या अपूर्व कर्तृत्त्वासाठी सबंध शेतकरी समाज कायमचा ऋणी झाला आहे.

अबब, काय तो मोठेपणा, काय तो थोरपणा, काय ती प्रज्ञावंत शोधण्याची दृष्टी? असा नेता होणे नाही. असा शेतकरी नेता आणि असला पंतप्रधान मिळणं म्हणजे भारतीयांच्या पूर्वजन्माचे कर्मच नाही का?

शरद पवार साहेब नसते तर, असा विचारच करवत नाही.

– महाराष्ट्रात १९९५-२०१४ या काळात देशातील सर्वाधिक म्हणजे एकूण ६३००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
– सिंचन वाढवण्यासाठी अगदी पुतण्याला रिकाम्या तळ्यात मुतायला सुद्धा लावले, काय ती दानशूरता?
– लावासा म्हणू नका, इओन आयटी पार्क म्हणू नका, मगरपट्टा म्हणू नका, पंचशील असले अनेक शेतकरी उपयोगी उपक्रम राबवले.
– मराठवाड्याकडून पाणी घेऊन बारामती आणि सभोवताली हिरवाई पसरवली, असं कोणाला जमले का कधी?
– बेळगावी मराठी जनतेला कर्नाटकात राहण्यासाठी जागा मिळवून दिली.

जय महाराष्ट्र!!

Tags: , , , ,
Posted in आत्महत्या, राजकारण, शेती | No Comments »

शासन व्यवस्था का व कशी पाहिजे – मोदी

Posted by Sandeep Shelke on January 18th, 2015

१६ जानेवारी २०१५ रोजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशातील शासन व्यवस्था का व कशी असावी यावरील विचार आंतरराष्ट्रीय वित्तीय परिषदेमध्ये मांडले. त्यांनी केवळ हे विचार बोलून दाखवले, परंतु ते कधी आणि कशा रीतीने पूर्ण करणार याविषयी वाच्यता नाही केली. असो, वरकरणी तरी त्यांनी मांडलेले खालील विचार देशासाठी चांगले आहेत असे मानता येईल. तसेच पंतप्रधान बोलतात त्यावेळी तेच शासनाचे धोरण आहे असे मानण्यास काही हरकत नाही.

सरकार किंवा शासन व्यवस्था का पाहिजे?

१. सार्वजनिक भल्यासाठी (बह्यांतर्गत सुरक्षा, न्याय व्यवस्था)

२. प्रदूषण, वातावरण बदल आदी गोष्टींवर नियंत्रणासाठी नियामक संस्था म्हणून

३. बाजारातील एकाधीकारासारख्या गोष्टींवर नियमन करण्यासाठी (माझं मत: बाजारावरील नियंत्रण हे अनैसर्गिक आहे. त्यामुळे त्यांना नक्की काय काय नियमित करायचे आहे याविषयी अजून स्पष्टता यायला हवी)

४. औषधासारख्या जीवनावश्यक वस्तूंची विश्वासार्हता दर्शविण्यासाठी (माझं मत: नक्की कोणत्या कोणत्या गोष्टी सरकारी दृष्टीने जीवनावश्यक आहेत आणि ते कसे ठरवतात हे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण कांद्यासारख्या पदार्थाला जीवनावश्यक यादीत टाकून नसती ढवळाढवळ वाढते…)

५. वंचितांना समान संधी मिळवून देण्यासाठी. वंचितांना सक्षम करण्यासाठी शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा मिळवून देण्यासाठी. (माझं मत: सरकारने गरीब आणि वंचितांसाठी निश्चितच पाऊल उचलले पाहिजे. परंतु तसे करताना स्वस्त धान्य दुकान, ग्रामीण रोजगार सारख्या योजनांच्या माध्यमातून बाजारातील ढवळाढवळ बंद केली पाहिजे. गरजूंना त्यांच्या बँक खात्यात उचित रक्कम द्यावी म्हणजे त्यांना हवे तिथून हव्या त्या गरजेच्या वस्तू विकत घेण्याचे स्वातंत्र्य मिळेल…)

सरकार किंवा शासन व्यवस्था कशी पाहिजे?

१. कार्यतत्पर आणि पै-पै साठी उत्तरदायी

२. व्यवसायामध्ये आणि खासगी जीवनात ढवळाढवळ करू नये

३. कार्यक्षम, प्रभावी, आणि प्रामाणिक

४. कायदे हेच सरकारचे गुणसूत्र असावे आणि ते कालानुरूप बदलत रहावे

सौजन्य> http://www.narendramodi.in

सौजन्य> http://www.narendramodi.in

आता हे सगळे साध्य करण्यासाठी ते काय नियोजन मांडतात ते पाहणे आवश्यक आहे.

माझ्या मते, खालील काही गोष्टी त्यांनी तत्काळ बदलायला हव्यात. 

१. सरकारी अधिकारी निवडीसाठी असलेली वयोमर्यादा काढून टाकावी. तसेच केवळ लोकसेवा आणि राज्यसेवा आयोगातून भारती करण्या ऐवजी खासगी संस्थांच्या धर्तीवर निवड करावी.

२. संशोधन संस्थामधील सरकारी मक्तेदारी संपुष्टात आणावी.

३. कोणालाही शाळा, महाविद्यालय उभारण्याची परवानगी असावी. तसेच अभ्यासक्रम ठरविण्यातील सरकारी मक्तेदारी संपुष्टात आणावी. तसेच ग्रामीण भागात वैद्याकीत महाविद्यालये उभारण्यासाठी जाचक अटी काढून टाकाव्यात.

४. हॉटेल, विमान, विमा, बँक आदी व्यवसायातून सरकारी भागीदारी विकून टाकावी. आणि तसेच सरकार परत कधीही व्यवसाय करणार नाही असा कायदा करावा.

५. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सगळे कायदे आणि न्यायव्यवस्था हे स्थानिक भाषेतून करावेत. हा बदल अतिशय महत्त्वाचा आहे कारण स्थानिक लोकांच्या भाषेतून असेल तरच तो समाज विकासाच्या आणि उन्नतीच्या वाटेवर मोठ्या प्रमाणात सहभागी होईल)

६. विविध विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांना जात, पंथ, व्यवसाय, वय, लिंग, स्थान आदि भेदावरून प्रवेश नाकाराण्याविरोधी कायदा करावा. आणि वित्तीय संस्थांना शैक्षणिक कर्ज प्राधान्याने द्यावे अशी विनंती करावी (आदेश नाही).

एक आपल्या सगळ्यांनाच मान्य करायला हवे कि मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी श्री बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर्थिक शिकवणीनुसार वाटचाल करण्याची वाच्यता वेळोवेळी केली आहे. अपेक्षा तर आहेच कि त्यात त्यांना यश मिळावे परंतु त्यासोबत आपण सगळेच आपापले काम प्रामाणिकपणे आणि कार्यक्षमतेने करूया. तरच आपल्याला आपले गतवैभव प्राप्त होईल.

जय महाराष्ट्र! जय भारत!

Tags: , , , ,
Posted in भारत, मराठी, माझे विचार, स्वातंत्र्य | No Comments »

मेरे बच्चों के साथ बैठकर फोटो मत निकालना

Posted by Sandeep Shelke on January 15th, 2015

पत्रकार एवम ज्येष्ठ कीर्तनकार हभप शामसुंदर महाराज सोन्नर इनकी लिखी कविता विधानसभा और विधान परिषद भवन में पढ़ी गयी जिसने भवन को दहला दिया। विधानसभा में सिन्नर के विधायक श्री झोरे और विधान परिषद में विधायक श्री जयंत जाधव इन्होने यह कविता पढ़ी। गत कुछ दिनो में संवेदनशील नागरिकोने यह कविता फेसबुक बड़ी मात्रा में शेअर की तभी जाकर यह कविता विधिमंडल में पहुंची।

मूल कविता मराठी में लिखी हैं, और कविताओं का भाषांतर करना बेहद कठिन होता हैं। किन्तु मैं प्रयत्न करता हुँ की कविता का आशय हिंदी भाषाको तक भी पहुंचे, क्यूंकि किसानों की आत्महत्याएं हम सभी के लिए बेहद पीड़ा का कारण हैं।

Borgen magazine

Borgen magazine

मिट गया मेरा सुहाग तब भी मुझसे न मिलना।
मेरे बच्चों के साथ बैठकर फोटो मत निकालना।

लाल दिये की गाड़ी में आएगी आपकी सवारी।
कॅमेरे के सामने करोगें शेरो शायरी।

बच्चों के बगल में बैठने से जगह की होगी कमी।
सफ़ेद रुमाल से पोछोगे आँखों की नमी।

झुटमुट की भावनाओं से आँसू मत निकालना।
मेरे बच्चों के साथ बैठकर फोटो मत निकालना।

खेती की सेवा के लिए सुहाग मेरा जिया।
आधे पेट रहकर भी आत्म सम्मान नही खोया।

धरती माँ की गोद भराई का था अर्ज।
फसल तो जल गयी लेकिन बढ़ गया कर्ज।

साहूकार के सितम ने बंद किया घर से निकलना।
मेरे बच्चों के साथ बैठकर फोटो मत निकालना।

फी नहीं बच्चों की पाठशाला के लिए।
मवेशियों को चारा नहीं डालने के लिए।

सुखा कुआं, ट्यूबवेल में नहीं पाणी की बूंद।
जलती फसल को देखते हुई आँखे मूंद।

बेशर्म सरकार के रहते साहूकारों ने बंद न किया लूटना।
मेरे बच्चों के साथ बैठकर फोटो मत निकालना।

उन्होंने रात को की बहोत मीठी मीठी बातें।
उनकी आँख में देख पाणी मन को चुभें काँटे।

आँख खुली सवेरे नहीं दिखे मेरे नाथ।
उन्होंने जान देकर कर दिया हमें अनाथ।

झुटमुट आँखे मूंदकर अब शोक मत करना।
मेरे बच्चों के साथ बैठकर फोटो मत निकालना।

जीते जी उन्हें किसी का सहारा न मिला।
पंचनामा अब हुआ बिना हाथ किये गिला।

कॅमेरे संग अंगनेमें पंहुची सफ़ेद गाड़िया।
इनका हुआ प्रचार मेरी लूट गयी दुनिया।

कहते हैं दुनिया सुधर गयी किन्तु लूट गयी मानवता।
मेरे बच्चों के साथ बैठकर फोटो मत निकालना।

अब होगी पैकेज की घोषणा, धनादेश भी मिलेगा।
क्या इससे मेरे बच्चो का बापू लौट आएगा।

सुहाग लूट गया मेरा किन्तु मैं नहीं हारूंगी।
बच्चो को अनाथ छोड़के मैं नहीं मरूंगी।

परन्तु आप बंद करे यह ढोंग और दोबारा मुझसे मत मिलना।
मेरे बच्चों के साथ बैठकर फोटो मत निकालना।

– पत्रकार एवम ज्येष्ठ कीर्तनकार हभप शामसुंदर महाराज सोन्नर

संबंधित: पोरा संग बसून नका काढू फोटूWhy Farmers Commit suicide

Tags: ,
Posted in आत्महत्या, कविता, शेती, हिंदी | No Comments »

पोरा संग बसून नका काढू फोटू

Posted by Sandeep Shelke on January 13th, 2015

प्रसिद्ध पत्रकार आणि ज्येष्ठ कीर्तनकार हभप शामसुंदर महाराज सोन्नर यांची कविता विधानसभा आणि विधान परिषदेत गाजली. विधानसभेत सिन्नरचे आमदार झोरे आणि विधान परिषदेत आमदार जयंत जाधव यांनी वाचून दाखविली.
गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांची मुले आणि त्यांच्या कष्टाचा सन्मान करणार्‍या संवेदनशील नागरिकांनी ही पोस्ट शेअर केली म्हणून विधिमंडळात पोहोचली.

Borgen magazine

Borgen magazine

मेला माझा नवरा जरी
मला नका भेटू.
माझ्या पोरा संग बसून
नका काढू फोटू…

लाल दिव्याच्या गाडीतून
येईल तुमचा ताफा..
कॅमेर्‍यात बघून बघून
मारल्या जातील थापा..

पांढरा धोट रुमाल काढून
डोळेसुद्धा पुसाल..
पोरक्या माझ्या पोरांना
खेटून खेटून बसाल..

खोटाखोटा कंठ तुमचा
नका देऊ दाटू..
माझ्या पोरा संग बसून
नका काढू फोटू..

धनी माझं गुणाचं
शेतामधी खपायचं..
अर्ध्या पोटी राहून सुद्धा
इभ्रतीला जपायचं..

काळ्या माईची वटीभराया
कर्ज थोडं काढलं..
पीक गेलं जळून पण
कर्ज मात्र वाढलं..

सावकार लागला छळू
तवा धीर लागला सुटू..
माझ्या पोरा संग बसून
नका काढू फोटू..

पोरगं जातय साळात
त्याची फीस नाही भरायला..
जनावरं दारात उभी
चारा नाही चारायला..

विहीर कधीच आटून गेली
बोरला नाही पाणी..
करपलेल्या पिकाकडं
पाहत राहायचं धनी..

सरकार झालय कोडगं
अन सावकार लागलेत लुटू..
माझ्या पोरा संग बसून
नका काढू फोटू…

रातच्याला जवळ घेऊन
लई गोड बोललं..
डोळ्यांत दिसलं पाणी
तवा काळीज माझं हलल..

जाग आली पाहटं तवा
जवळ नाही दिसलं..
फंख्याला फाशी घेऊन
कुंक माझं पुसलं..

खोटे अश्रू डोळ्यात आणून
आता नका चुटपूटू..
माझ्या पोरा संग बसून
नका काढू फोटू..

धनी होतं तवा कुणी
धीर नाही दिला..
आता किती तातडीने
पंचनामा बी केला..

कॅमेरे घेऊन पांढर्‍या गाड्या
आल्या दारामंदी..
आभाळ फाटलंय आमच
यांना प्रसिद्धीची संधी..

म्हणे जग लई सुधारलय
परं माणुसकी लागलीय आटू..
माझ्या पोरा संग बसून
नका काढू फोटू..

होईल घोषणा पॅकेजची
मदतीचा चेक येईल..
माझ्या लेकरांचा बाप
कोण आणून देईल..

धनी जरी गेलं तरी
मी न्हाई हारायची..
पोरांना करून पोरकं
मी न्हाई मरायची..

तुमचं मात्र थांबवा ढोंग
मला नका भेटू..
माझ्या
पोरा संग बसून
नका काढू फोटू….

– प्रसिद्ध पत्रकार आणि ज्येष्ठ कीर्तनकार हभप शामसुंदर महाराज सोन्नर

स्रोत- राजू परुळेकर यांच्या फेसबुक पानावरून

संबंधित: Why Farmers Commit suicide मेरे बच्चों के साथ बैठकर फोटो मत निकालना

Tags: , ,
Posted in आत्महत्या, कविता, मराठी | 1 Comment »

 
%d bloggers like this: